(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange-Pati : छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या - मनोज जरांगे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
NCP : माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या १४ प्रवक्त्यांची यादी जाहीर...
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेसकडून माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी १४ प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, रुपालीताई ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, ताराचंद म्हस्के -पाटील, सायली दळवी आदींचा समावेश आहे.
Yavatmal : कंत्राटी कर्मचारी संघाचे दोन कामबंद आंदोलन
Wardha : वर्ध्यात 2 हजार 700 प्रगणकाद्वारे मराठा कुणबी सर्व्हे
Maharashtra News LIVE Updates: वर्धा जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी घेण्याचा सर्व्हे केला जात आहे. याकामी 2 हजार 700 प्रगणक कामी लावण्यात आले. यात शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. आतापर्यंत 2 लाख 16 हजार कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. जवळपास 70 टक्के सर्व्हे पूर्ण झाला असून आज हा सर्व्हे पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही मोडी लिपीतील नोंद आढळून आली नाही
Akola : पोवाड्यात अफजलखान वधाचं दृष्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावली
Maharashtra News LIVE Updates: अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात अफजलखान वधाचं दृष्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोल्यातील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात हा प्रकार घडलाय. औरंगजेबाच्या वधाचं दृष्य दाखवल्यानं आपल्या भावना दुखानल्याचा आरोप एका विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांनी केला होताय. त्यानंतर नाट्य सादर करणार्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलंय. अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी या प्रकरणी पोवाडा सादर करण्याला विरोध करणाऱ्या एका विशिष्ट धर्माच्या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेत. यासंदर्भात पोवाडा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलीस तक्रार केली होती. या तिन्ही विद्यार्थ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याची कलमं लावण्यात आलीयेत. दरम्यान, याप्रकरणी आज अकोल्यातील शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन केलंय. सरकारला निवेदन देत आंदोलकांनी तिन्ही विद्यार्थ्यांच्या अटकेची मागणी केलीये.
Eknath Shinde : बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त
Maharashtra News LIVE Updates: बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त झाल्याची कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या रुग्णालयावर पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्याची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांस कळविले की डॉ. अनुदुर्ग ढोणी गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबिवली पूर्व ठाणे या रुगणालयाने बनावट कागदपत्रान्वये अर्थसहाय्य प्राप्त केल्याचे दिसुन आल्याने रुग्णालयातील डॉक्टर , कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्ती यांचा संशय आल्याने पुढील चौकशी करुन आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करणेबाबत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांना दिनांक. 06.11.2023 च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी संपूर्ण विवरणासहित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अशी अनेक प्रकरणे बाहेर येतील आणि बोगसगिरीवर आळा बसेल. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होईल.