एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 8th April 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 8th April 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Background

आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयु तिरावर आरती करणार आहेत. आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि कोलकाता यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रामलल्लाचं दर्शन घेणार -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आयोध्या दौऱ्यावर आहेत. ते रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयु तिरावर आरती करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही रामलल्लाच दर्शन घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली. 

राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर... 

आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. 

- बीड : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यातही नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळी पावसामुळे औरंगाबाद, हिंगोली,परभणी आणि बीडमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय... मराठवड्यात 54 जनावराचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरू आहे...

- पंढरपूर - पावसाच्या दणक्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत... शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अटी शिथिल केल्याचे सांगत असले तरी बेदाणे करणाऱ्या शेतकऱ्यांची यापेक्षा वाईट आहे... 1 किलो बेदाणा बनवायला 70 ते 80 रुपये खर्च येत असताना दोन दिवसांच्या अवकाळीमुळे दर 50 रुपये पर्यंत घसरले आहेत... शासनाच्या नियमानुसार 5 दिवस रोज किमान 10 मिलिमीटर पाऊस पडला तर नुकसान भरपाई मिळते, मात्र बेदाण्याला पाऊस न पडता नुसत्या ढगाळ हवामानाचाही फटका बसून 200 रुपयांचे भाव चार पटीने कमी होत आहेत. 

शिर्डी-शेगावात भक्तांची मोठी गर्दी -

शिर्डी/शेगाव - सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी...  शिर्डी, शेगाव, पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी... शिर्डीच्या साई मंदिराच्या, शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनरांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं चित्र आहे... आज रविवार असल्यानं अनेक भाविक दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी करण्याची शक्यता आहे.

- बुलढाणा - दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राज्यभरातून भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे... सलग आलेल्या तीन ते चार दिवसांच्या सुट्टीमुळे राज्यभरातील भाविक वेगवेगळ्या मार्गाने शेगाव दाखल होत आहे आणि त्यामुळे दररोज शेगावत एक ते दीड लाख भाविक संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेत आहेत... यामुळे शेगावात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे... (सकाळी 7.30 वाजता डॉ. संजय महाजन लाईव्ह)

पुणे - खासदार सुप्रिया सुळे या मुळशी तालुक्यातील अम्रिता विद्यालय या शाळेचे उद्घाटन सकाळी करणार आहेत. 

पुणे - भाजपकडून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन.  डेक्कन भागातील सावरकर स्मारकापासून सुरुवात. 

सातारा - विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सातारा जिल्हा दौरा... सकाळी 9.30 वाजता जिल्हा बँकेमध्ये ज्येष्ठ उद्योजक श्रीधर कंग्राळकर यांच्या वडिलांच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे त्यासाठी अजित पवारांची उपस्थिती... कंग्राळकर हे अजित पवारांचे मावसभाऊ आहेत... सकाळी 1130 वाजता मराठा बिझनेस यांचा वाढे फाटा या ठिकाणी आहे..  दुपारी 3.30  वाजता मेढा येथे शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश असा कार्यक्रम आहे.  भाजपचे सक्रिय कार्यकर्ते अमित कदम हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. अमित कदम हे माजी आमदार जी.जी. कदम यांचे सुपुत्र आहेत

नाशिक - शरद पवार नाशिक मुक्कामी आहेत… सकाळी देवरगाव इथे आश्रम शाळा हॉस्टेल आणि शाळा इमारत भूमिपूजन सोहळा होणार आहे... दुपारी दोन पर्यंत नाशिकमध्ये आहेत, त्यानंतर पुण्याला जाणार आहेत.

10:00 AM (IST)  •  09 Apr 2023

Nagpur: भरधाव वेगाने एसटी चालवत मोबाईल फोनवर बोलणाऱ्या एसटी बस चालकाचा व्हिडीओ व्हायरल

Nagpur: भरधाव वेगाने एसटी चालवत मोबाईल फोनवर बोलणाऱ्या एसटी बस चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 31 मार्च रोजीचा आहे. नागपूर जिल्ह्यातील बस चालकाचा हा व्हिडीओ आहे. एसटी बसमधील एका प्रवाशाने हा व्हिडीओ काढला होता. मोबाईल फोनवर बोलण्यासह वारंवार मोबाईलवरून मॅसेज देखील हा बस चालक करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

09:58 AM (IST)  •  09 Apr 2023

Shirdi: सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी

Shirdi: सध्या सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळावर गर्दी केलीय. राज्यातली सगळी पर्यटनस्थळं फुल्ल झालीयेत.. तर तिकडे शर्डीमध्येही भाविकांचीही मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं... या सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेक व्यवसायांना देखील चालना मिळालीय. दरम्यान राज्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विशेष खबरदारी  घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.. त्याच अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं अवाहनही केलं जातंय... 

07:29 AM (IST)  •  09 Apr 2023

CM Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत, रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती करणार

CM Eknath Shinde Ayodhya Visit : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Daura) आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून सुरू होणारा मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे सेनेला राज्यभरातील तळागाळात नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा प्रचार करणं ही सध्याची राजकीय खेळी दिसून येत आहे.

07:12 AM (IST)  •  09 Apr 2023

Buldhana News : दहावी, बारावीच्या परीक्षेनंतर आलेल्या सलग सुट्यांमुळे संत नगरी शेगावात भाविकांची अलोट गर्दी

Shegaon Gajanan Temple : दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राज्यभरातून भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे. सलग आलेल्या तीन ते चार दिवसांच्या सुट्टीमुळे राज्यभरातील भाविक वेगवेगळ्या मार्गाने शेगाव दाखल होत आहे आणि त्यामुळे दररोज शेगावत एक ते दीड लाख भाविक संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेत आहेत. यामुळे शेगावात भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget