(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News Updates 8th April 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे मंत्री, आमदार अयोध्येत दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवशीय आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. राज्यात आज आवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट... तर, कोल्हापूर,धुळे आणि छ. संभाजीनगरमध्ये हवामान विभागाकडून गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..
एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवशीय आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. राज्यातून हजारो शिवसैनिक, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री रामलल्लाच्या दर्शनाला आयोध्येत पोहचले आहेत. शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसह आयोध्या दौऱ्यावर येत आहेत... या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री रविवारी रामलल्ला, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबतच राज्यातून ठाणे आणि नाशिकमधून दोन ट्रेन्सदेखील रवाना झाल्या आहेत... या दोनही ट्रेन्समधून कार्यकर्ते आयोध्येत पोहचणार आहेत. आयोध्येत धनुष्यबान असलेले अनेक बॅनर्स लागले असून आजूनही बॅनर्स लावण्याच काम शिवसैनिकांकडून सुरू आहे... 3 हजार पेक्षा जास्त शिवसैनिक आयोध्येत येणार असल्यानं त्यांच्या रहाण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्सचं बुकिंग करण्यात आलयं.
राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा धुमाकूळ
राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा धुमाकूळ घातला आहे. मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे. विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट... तर, कोल्हापूर,धुळे आणि छ. संभाजीनगरमध्ये हवामान विभागाकडून गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे... तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.... तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.
आशिष देशमुख अजित पवारांच्या भेटीला
पुणे – काँग्रेसमधून निलंबीत झालेले नेते आशिष देशमुख घेणार विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट... देशमुख राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा सुरू असताना होत असलेली ही भेट महत्वाची आहे.
नागपुरात आज महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक
नागपूर - नागपुरात आज महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक... 16 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या सभेच्या तयारी संदर्भात ही बैठक होणार आहे... या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आमदार आणि स्थानिक नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहे... ही बैठक दुपारी 3.30 वाजता जट्टेवार सभागृहात होणार आहे...
पुणे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मावळमध्ये जाहीर मेळावा
नाशिक - पालकमंत्री दादा भुसे सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई आढावा बैठक घेणार आहेत... त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस शासकीय वाहनांचे उदघाटन करून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
नाशिक - नाशिक करन्सी नोटप्रेसच्या हिंदू मजदूर सभेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दुपारी 3 वाजता लावणार हजेरी
सांगली – सांगलीत आजपासून तिसऱ्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला मिरजमध्ये सुरूवात होणार... यामध्ये 17 राज्यातील 250 हुन अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपट्टू सहभागी होणार आहेत... दोन दिवस ही स्पर्धा चालेल.
पालघर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पालघर जिल्हा दौऱ्यावर... सकाळी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी राहणार उपस्थित... याच कार्यक्रमासाठी राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणही उपस्थित असणार... त्यानंतर पवार नाशिक दौऱ्यावर जाणार
वाराणसी – भोजपुरी फिल्म अभिनेत्री अकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी अटक केलेला गायक समर सिंहला आज कोर्टात हजर करणार
हैद्राबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडू आणि तेलंगणा दौऱ्यावर... अनेक कामांच करणार उद्घाटन... सिकंदराबाद – तिरूपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
वंचितचे इफ्तार पार्टीचे आयोजन
मुंबई - वंचितच्या वतीने सायंकाळी 6 वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान उपस्थित असतील... सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असेल... ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर भविष्यातली रणनीती नेमकी कशी असणार आहे, सुजात आंबेडकर नेमकं सध्या काय करताय, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे काय भूमिका असेल अशा विविध मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची मुलाखत करतो.
पंढरपूर - सांगोला येथे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरुवात होणार... सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात होईल... सकाळी 11.30 वाजता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घघाटन होणार आहे... या सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती आहे... आमदार शहाजीबापू पाटील स्वगताध्यक्ष आहेत
मनमाड - आजपासून नांदगाव रेल्वे स्थानकावर कामायनी, कुशीनगर व जनता एक्सप्रेस या तीन गाड्यांचे थांबे पूर्ववत होणार असल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार ह्या नांदगाव येथे हिरवा झेंडा दाखवणार आहेत
अहमदनगर - भाजप आणि शिवसेना तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी यांच्या वतीने अहमदनगर शहरातून सकाळी 10 वाजता 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा' काढली जाणार आहे... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या गौरव यात्रेला सुरुवात होईल... खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही गौरव यात्रा होणार आहे.
शिर्डी - गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित नाईट लँडिंग सुविधेला आज शिर्डी विमानतळावर सुरवात होणार असून दिल्लीहुन पहिलं विमान शिर्डी विमानतळावर दाखल होणार आहे... अवघ्या काही वर्षात शिर्डी विमानतळाला मोठा प्रतिसाद मिळत असून नाईट लँडिंग सुविधेनंतर साईभक्तांना 24 तास शिर्डीत येता येणार आहे
आयपीएलमध्ये डबल धमाल -
आयपीएलमध्ये आज दोन लढती होणार आहेत. यामध्ये चेन्नई आणि मुंबई यांच्या लढतीकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे. मुंबई वानखेडे स्टेडिअमवर दोन वर्षानंतर खेळत आहे. मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना आज सायंकाळी होणार आहे. तर दुपारी राजस्थान आणि दिल्ली यांच्यामध्ये लढत होणार आहे.
Mumbai News: मुंबईत दहशतवादी आल्याचा फोन खोटी माहिती देणारा, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
Mumbai News: मुंबईत तीन दहशतवादी आल्याची नियंत्रण कक्षाला कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या अनोळखी इसमा विरुध्द मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात भादंविच्या 505(1), 505(2) आणि 182 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता तपासाअंती सदरचा कॉल हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही भीती बाळगू नये आणि शांतता ठेवावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे मंत्री, आमदार अयोध्येत दाखल
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाचे मंत्री, आमदार अयोध्येत दाखल
आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, तुकोबांची पालखीचे 10 जूनला प्रस्थान
Ashadhi Wari Palkhi : अखंड महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जूनला पालखी पंढरीत दाखल होईल तर आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेईल अन प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडेल. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा होताच वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण पसरले असून आता ते पायी वारीच्या तयारीला लागला आहे.
Bhiwandi News : भिवंडी शहरातील टेमघर पाडा परिसरात अरिहंत सिटी सोसायटीमधील इमारतीला आग, 25 जण अडकल्याची भीती
Bhiwandi News : भिवंडी शहरातील टेमघर पाडा परिसरात अरिहंत सिटी सोसायटीमधील बी विंग इमारतीला शॉकसर्किटने आग
इमारतीत 20 ते 25 जण अडकले असल्याचे प्राथमिक माहिती
इमारतीत अनेक जण अडकून पडल्याने मदतीसाठी खिडकी गॅलरी तसेच टेरेसवरून हाक
संपूर्ण इमारतीत धुराचे लोड पसरल्याने श्वास घेण्यास त्रास
भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे सर्दीचा प्रयत्न सुरू
Nashik sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार नाशिकमध्ये दाखल
Nashik sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार हे दोन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत टकले, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.