Maharashtra News Updates 7th May 2023 : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3.5 किलो सोन्याची पेस्ट जप्त, 11 जणांना अटक, DRI ची मोठी कारवाई
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Karnataka Elections 2023: कर्नाटकात आज प्रचाराची रणधुमाळी; मोदी-शाहांना राहुल-प्रियांकाची टक्कर, संपूर्ण राज्यात सभा अन् रोड शोचा सपाटा
Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) काँग्रेसच्या (Congress) बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. एकूणच आज कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे, याच काही शंकाच नाही.
कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) बंगळुरूमध्ये 36 किलोमीटर लांबीचा रोड शो करणार आहेत. पीएम मोदींचा हा मेगा रोड शो दोन भागांत विभागला गेला आहे. यापैकी एक म्हणजे 26 किमी लांबीचा रोड शो आदल्या दिवशी (6 मे) करण्यात आला आहे. तसेच, आज (7 मे) दुसरा 10 किमी लांबीचा रोड शो होणार आहे. रोड शोनंतर पंतप्रधान शिवमोग्गा (Shivamogga) आणि म्हैसूर (Mysuru) येथे दोन जाहीर सभा घेणार आहेत.
Go First पाठोपाठ आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर; प्रकरण नेमकं काय?
Airline Crisis: गो फर्स्ट (GO First) पाठोपाठ आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार असून ती कंपनी म्हणजे, स्पाईसजेट (Spicejet). नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) पुढील आठवड्यात स्पाईसजेट कंपनीच्या कर्जदात्यानं दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. स्पाईसजेटविरोधातील दिवाळखोरीच्या याचिकेवर एनसीएलटीमध्ये 8 मे रोजी सुनावणी होणार आहे.
स्पाईसजेटच्या विरोधात NCLT समोर अर्ज कोणी दाखल केला?
लो कॉस्ट एअरलाईन्स सेवा देणारी विमान कंपनी स्पाईसजेटला कर्ज देणारी कंपनी एअरक्राफ्ट लेसर एअरकॅसल (आयर्लंड) लिमिटेडनं दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी NCLT कडे अर्ज दाखल केला आहे. 28 एप्रिल रोजी हा अर्ज दाखल करण्यात आला होता. एनसीएलटीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, न्यायाधिकरणाचं मुख्य खंडपीठ या अर्जावर 8 मे रोजी सुनावणी करणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3.5 किलो सोन्याची पेस्ट जप्त, 11 जणांना अटक, DRI ची मोठी कारवाई
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3.5 किलो सोन्याची पेस्ट जप्त.
आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट प्रवाशांच्या मदतीने सुरू होती सोन्याची तस्करी.
विमानतळावरील कर्मचारी देखील होते सहभागी.
ड्यूटी फ्री शॉप तसेच फूड कोर्ट कर्मचारी होते सहभागी.
दोन कोटी रुपयांचे सोन जप्त.
मुंबईला थांबा असलेल्या बँकॉक ते दुबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने सुरू होती सोन्याची तस्करी.
ट्रान्झिट प्रवाशी विमानतळ कर्मचाऱ्यांच्या हवाली सोन देत असत आणि ते सोन्याला विमानतळाबाहेर असलेल्या हस्तकांकडे सुपूर्द करत.
विमानतळ कर्मचाऱ्यांची भरती करणाऱ्यांना देखील केली अटक.
एकूण 11 लोकांना केली DRI ने अटक.
Sanjay Sirsat : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या शेतात चोरी
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या शेतात चोरी
चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीचं ट्रॅक्टर ट्रॉलीसह नेली चोरून
सातारा परिसरातील शेतातून झाली ट्रॅक्टरची चोरी
शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shahapur News: शहापूरात घर आगीच्या भक्षस्थानी, पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यास अडचणी
Shahapur News: शहापूर शहरातील कासार आळी येथील छाया प्रभाकर ढोबळे यांच्या मालकीच्या घराला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घरात आग लागल्याचे समजतात घरातील सदस्यांनी पळ काढला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे संपूर्ण घर जळून खाक झाल्यानं घरातील कपडे,धान्याची कोठारे, कपाट, लाकडी पलंग, लग्नाची नवीन भांडी, देवघरातील साहित्य, घराचे पत्रे पूर्णतः जळून खाक झाले आहे. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी ढोबळे कुटुंबीयांनी केली आहे.