Maharashtra Live Updates : कल्याण डोंबिवलीतील काही भागांमध्ये पाच तास विद्युत पुरवठा बंद राहणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
कल्याण डोंबिवलीतील काही भागांमध्ये पाच तास विद्युत पुरवठा बंद राहणार
कल्याण डोंबिवलीतील काही भागांमध्ये पाच तास विद्युत पुरवठा बंद राहणार
महावितरणाचे देखभाल दुरुस्तीसाठी शट डाऊन. डोंबिवली आणि कल्याणच्या काही भागामध्ये उद्या बुधवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली आहे. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण करणारे झाडे तोडणे पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीचे काम करणे इत्यादी महत्वाच्या कामासाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
कल्याण आंबिवली परिसर, नवापाडा ,गणेश नगर ,कुबेर समृद्धी ,हरिप्रिया सोसायटी, 52 चाळ ,गावदेवी मंदिर ,शंकेश्वर पाम्स ,लक्ष्मी लोटस ,चर्च ,जैन कंची ,राज वैभव सोसायटी ,या भागातील विद्युत पुरवठा बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे.
Raigad News: रायगड: कर्नाळा खिंडीत शिवशाही बसचा अपघात. बस उलटल्याने एकाचा मृत्यू तर 22 जखमी
Raigad News: पनवेल वरून महाडला जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात झाल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. कर्नाळा खिंडीत बस पोचली असता टर्निंगला ड्रायव्हरचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्ता सोडून खाली नाल्यात जावून आदळली. यामुळे बसने पल्टी खाल्याने आतील प्रवाशांना मार बसला. या बसमध्ये एकूण 38 प्रवाशी होते. यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल ग्रामीण , एमजीएम कामोठे आणि पेन मधील रूग्णालयात दाखवण्यात आले आहे.
Wardha News: वर्धा: पुन्हा अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट; उन्हाळी पिकांना बसणार फटका
Wardha News: वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात आज पुन्हा गारपीटसह पाऊस झाला. अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अचानक होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. देवळी तालुक्याच्या अनेक भागात गारपीटही झाली आहे. वर्धा, सेलू, कारंजा व हिंगणघाट या भागात पावसाच्या सरी बरसल्या.
Mumbai Fire News: मुलुंड स्टेशन परिसरात इमारतीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
Mumbai Fire News: मुलुंड स्टेशन परिसरात असलेल्या धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. सहा माळ्याची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावर काही नागरिक अडकले होते. त्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी सुखरूप सुटका केली. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित चर्चा करणार
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित चर्चा करणार
चर्चेसाठी खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत मातोश्रीवर
बारसु येथील स्थानिकांनी विरोध केलेला आहे ठाकरे गटाचा देखील विरोध आहे
मातोश्रीवर प्रमुख नेते पुढील रणनीतीवर करणार चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
