एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 16th April 2023 : यवतमाळ: शेतीच्या जुन्या वादातून युवकाची हत्या, उमरखेड तालुक्यातील अमडापुर येथील बस स्थानकावर झाला हल्ला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 16th April 2023 : यवतमाळ: शेतीच्या जुन्या वादातून युवकाची हत्या, उमरखेड तालुक्यातील अमडापुर येथील बस स्थानकावर झाला हल्ला

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आज मुंबईसह राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (रविवारी) 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स दिले आहे. आज सकाळी 11 वाजता केजरीवाल यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे...

नवी मुंबई – आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित खारघरमध्ये भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आळा आहे. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

नागपूर – महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.  महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित रहाणार आहेत. 

प्रयागराज – गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या. करण्यात आली. मेडिकल तपासणीसाठी घेऊन जात असताना बाईकवरून आलेल्या तिघांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलेय, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
 
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट... गारपीटीचा सडा पडल्याचे अनेक ठिकाणी चित्र  आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स दिले आहे. आज सकाळी 11 वाजता केजरीवाल यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं आहे... दिल्लीचे सर्व खासदार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पंजाबचे इतर मंत्री केजरीवाल यांच्यासोबत सिबीआय मुख्यालयापर्यंत पोहचून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 

बंगळुर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन दिवसीय कर्नाटक दौरा... आज राहुल गांधी कोलारमधून प्रचाराचा शुभारंभ करतील... याच कोलारमध्ये राहुल यांनी मोदी आडनावाची टिपन्नी केली होती.. त्यावरून राहुल यांची खासदारकी रद्द झाली आहे... दुपारी राहुल गांधी कोलारमध्ये सभा घेणार आहेत.

मुंबई - नाट्य परिषदेच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत मतदान होईल... मुंबईत यशवंत नाट्य मंदिर माटुंगा,  याठिकाणी मतदान होणार आहे... प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांच पॅनेल समोरासमोर उभ आहे.

पुणे  -  कै. खा. गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आलयं.... सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलंय... शरद पवार, नितीन गडकरी, रामदास आठवले, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, बाळा नांदगावकर, सचिन आहीर, प्रकाश जावडेकर, श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासह इतर महत्वाचे नेते असतील. 

पुणे - खासदार सुप्रिया सुळे कात्रज चौकातील विकासकामांची सकाळी 8.30 वाजता पाहणी करणार आहेत. 

सांगली  -  राष्ट्रीय लिंगायत समाज, मेळावा... जगदज्योती महात्मा बसव्वाण्णा जयंती निमित्त लिंगायत समाज मेळावा आणि बसवरत्न गौरव पुरस्कार सोहळ्याच आयोजन करण्यात आलंय... कामगार मंत्री सुरेश खाडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सुमित कदम यांची उपस्थिती असेल. 

सांगली - ऊस वाहतूकदारांचा निर्णायक मेळावा... एकमताने निर्णायक घोषणा होणार... ऊस तोडणी मुकादमांकडून दरवर्षी होणारी कोट्यावधीची फसवणूक, त्यातून देशोधडीला लागणारे ऊस वाहतूकदार, त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, हे सत्र थांबले पाहिजे. त्यासाठी ऊस तोडणी टोळी करार स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून आणि केंद्रीकरण पद्धतीनेच झाले पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी ऊस वाहतूकदार मेळावा.. माजी खासदार राजू शेट्टी आणि संघटना नेते पृथ्वीराज पवार यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी नेते उपस्थित असणार आहेत..  

नाशिक - वरुथिनी एकादशी निमित्ताने दुपारी 1 वाजता त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांना उटीचा लेप लावण्यात येणार असून हजारो भाविक हजेरी लावणार आहेत...

धुळे - महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.... यात प्रशांत दामले यांच्या नटराज पॅनलचे उमेदवार चंद्रशेखर पाटील आणि अपक्ष उमेदवार यशवंत येवलेकर यांच्यात लढत होत आहे... धुळे जिल्ह्यातील 300 मतदार आपला या नाट्य परिषदेच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत.... नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी धुळ्यात पहिल्यांदा ही निवडणूक होत आहे. 

16:51 PM (IST)  •  17 Apr 2023

Nashik Crime : ऑनलाईन गेम खेळत असाल तर सावधान! तुमचं बँक खात रिकामं होऊ शकत... नाशिकमध्ये काय घडलं?

Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथील तरुणाला ऑनलाईन गेमिंग चांगलेच महागात पडले आहे. 

15:57 PM (IST)  •  17 Apr 2023

Phakaat Movie: कलाकारांची दमदार फळी असणारा फकाट 'या' दिवशी होणार रिलीज; हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे प्रमुख भूमिकेत

Phakaat Movie:  प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सिक्रेट असतं, हे सिक्रेट दुसऱ्या कोणाला तरी कळालं तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही. याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फकाट' असे हटके नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून येत्या 19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये हेमंत ढोमे (Hemant Dhome) , सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव दिसत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

22:31 PM (IST)  •  16 Apr 2023

Yavatmal News: यवतमाळ: शेतीच्या जुन्या वादातून युवकाची हत्या, उमरखेड तालुक्यातील अमडापुर येथील बस स्थानकावर झाला हल्ला

Yavatmal News: यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील अमडापुर येथील बसस्थानकावर युवकावर प्राण घातक चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली. प्रकाश प्ररसराम राठोड (25) असे मृतकाचे नाव आहे. मृतक प्रकाश राठोड आणि कुंडलिक राठोड यांच्यात मागील अनेक वर्षांपासून शेतीचा जुना वाद होता. बस स्थानकावर बसला असताना अचानक त्याच्यावर चाकू हल्ला झाला. त्यात तो गंभीर झाला. 

22:30 PM (IST)  •  16 Apr 2023

Latur: लातूर कृषी बाजार समितीच्या निवडणूक वेगवान घडामोडी...30 वर्षाच्या काँग्रेसच्या एकहाती सत्तेला भाजपकडून आव्हान

Latur News: राज्यातील नावाजलेल्या बाजार समितीपैकी एक असलेली लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आता  रंगात आली आहे.. काँग्रेसला सुकर असणारी निवडणूक आता अटीतटीची होणार असल्याची चिन्हे आहेत.. भाजपातील दोन गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची स्थिती निर्माण झाल्याने काँग्रेस समोरची आव्हाने वाढली आहेत.

13:04 PM (IST)  •  16 Apr 2023

Beed News: अधिक मासामध्ये पुरुषोत्तमपूरी येथील पुरुषोत्तमाचे दर्शन मंदिरात घेता येणार नाही; मंदिराच काम सुरू असल्याने शेडमध्ये ठेवण्यात येणार मूर्ती

Beed News: अधिक मासामध्ये पुरुषोत्तमपूरी येथील पुरुषोत्तमाचे दर्शन मंदिरात घेता येणार नाही.. मंदिराच काम सुरू असल्याने शेडमध्ये ठेवण्यात येणार मूर्ती. यावर्षी अधिक मासामध्ये भारतात एकमेव असलेल्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच दर्शन भाविकांना मंदिरामध्ये जाऊन घेता येणार नाही कारण पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू करण्यात आला असून त्यामुळे अधिक मासामध्ये भाविकांना मंदिरामध्ये दर्शन न घेता एका शेडमध्ये भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती ठेवण्यात येणार असून त्या ठिकाणी भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचं मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आला आहे. पुरुषोत्तम पुरी येथे यादवकालीन असलेल्या या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत असून देशांमध्ये एकमेव असलेलं भगवान पुरुषोत्तमाचं हे मंदिर असून अधिक मासामध्ये भाविकांना मंदिरात दर्शन घेता  येणार नाही त्यासाठी 28 एप्रिल रोजी मूर्ती एका शेडमध्ये हलविण्यात येणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget