एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 14th May 2023 : अकोल्यात उद्या होणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; संचार बंदी, इंटरनेट बंदीमुळे निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 14th May 2023 : अकोल्यात उद्या होणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; संचार बंदी, इंटरनेट बंदीमुळे निर्णय

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Sunil Kanugolu: करेक्ट प्लानिंग अन् अचूक टायमिंग; काँग्रेसच्या कर्नाटक विजयचा रियल हिरो, कोण आहेत सुनील कानुगोलू?

Sunil Kanugolu: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Election 2023) निकाल समोर आले आहेत. कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसनं बाजी मारली असून भाजपचा (BJP) राज्यातून सफाया केला आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची लाट असतानाच, त्यांच्यात या विजयाचं श्रेय वाटून घेण्यासाठी चढाओढही सुरू आहे. काँग्रेसच्या या विजयात अनेक वाटकेरी आहेत. ज्यांच्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत परतली आहे. काँग्रेसच्या विजयाच्या मानकऱ्यांबाबत बोलायचं झालं तर अनेक नावं समोर येतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यापासून ते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्यापर्यंत, काँग्रेसच्या विजय अनेक नावांमध्ये विभागला जाऊ शकतो, परंतु या सर्वांमध्ये एक नाव आणि चेहरा आहे, ज्याच्या बाजूनं सर्व एकमतानं उभे राहतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनवणाऱ्या आणि या निकालाची पटकथा लिहिणारं ते नाव म्हणजे सुनील कानुगोलू (Sunil Kanugolu).

काँग्रेसचे मुख्य रणनीतिकार

सुनील कानुगोलू ही अशी व्यक्ती आहे जी कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी एक आहेत. संपूर्ण निवडणुकीदरम्यान, त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनिती आखली. भाजपची निवडणूक भाषणं आणि अजेंड्याला छेद देत त्यांनी भ्रष्टाचार, गैरकारभाराच्या आरोपात अडकलेल्या भाजपशासित सरकारचा पर्दाफाश केला. विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या यशाचं संपूर्ण श्रेय काँग्रेस कार्यकर्त्यांना जातं, पण प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधून काढणं, लोकांची नाडी जाणून घेण्यासाठी वेगवेगळी सर्वेक्षणं करणं आणि त्याद्वारे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनिती आखणं ही जबाबदारी सुनील कानुगोलू यांच्या खांद्यावर होती. काल जाहीर झाल्यालेल्या निकालांवरुन ते स्पष्ट झालं की, त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 

Sameer Wankhede : "देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय"; CBI छापेमारीनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वानखेडे यांच्यावर सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात इतर अनेक अधिकारी आणि खासगी लोकांचीही नावं आहेत. सीबीआयनं समीर वानखेडे यांच्या घरावर एक दिवस आधी छापा टाकला होता. आता यासंदर्भात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं वक्तव्य समोर आलं आहे. देशभक्त असल्याची शिक्षा मिळत असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. 

शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागानं समीरच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आणि 13 तास चौकशी केली. वानखेडे 2021 पासून चर्चेत आहे, जेव्हा त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना मुंबईतील क्रूझवर अटक केली होती.

22:50 PM (IST)  •  14 May 2023

Akola News: अकोल्यात उद्या होणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; संचार बंदी, इंटरनेट बंदीमुळे निर्णय

Akola News:  अकोला: अमरावती विद्यापीठ अंतर्गत उद्या अकोल्यातील 11 वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  अकोल्यातील काही भागात लागू असलेली संचार बंदी तसेच इंटरनेट सेवेवरील बंधने आदी या कारणामुळे प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे. 

20:27 PM (IST)  •  14 May 2023

छत्रपती संभाजीनगर: राजपूत समाज आहे त्यांच्या समोरील भामटा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेत असून आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर: राजपूत समाज आहे त्यांच्या समोरील भामटा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेत असून आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राजपूत समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.

20:02 PM (IST)  •  14 May 2023

Jalgaon News: जळगाव: शॉर्ट सर्किट मुळे उसाच्या शेताला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान

Jalgaon News: महावितरण कंपनीच्या वीज तारां मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे  जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील वावडदा गावातील शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी जानकीराम पाटील यांच्या दोन एकर उसाच्या शेताला आग लागून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वावडदा येथील शेतकरी जानकी राम पाटील हे स्वतः ऊस उत्पादन करून स्वतःच उसाची रसवंती चालवत आपला उदरनिर्वाह करतात. 

19:08 PM (IST)  •  14 May 2023

Sharad Pawar LIVE: शरद पवारांचा माध्यमांशी संवाद

Sharad Pawar LIVE: कर्नाटकाने देशाला एक संदेश दिला आहे - शरद पवार 

19:07 PM (IST)  •  14 May 2023

Sharad Pawar LIVE: डी.राजा यांनी सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar LIVE: भाजपाला हरवू शकतो हे कर्नाटक निवडणुकांनी दाखवून दिलं - डी.राजा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
EPFO : ऑक्टोबर महिन्यात इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स वाढले, कोणतं राज्य सर्वात पुढं?आकडेवारी समोर
ऑक्टोबरमध्ये इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स  वाढले, महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Kalyan crime: कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaBeed Crime Special Report : गन कल्चर मुक्त बीड कधी होणार? हजारो जणांना शस्त्र परवाने कशासाठी ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime News : कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी द्या! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
EPFO : ऑक्टोबर महिन्यात इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स वाढले, कोणतं राज्य सर्वात पुढं?आकडेवारी समोर
ऑक्टोबरमध्ये इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स  वाढले, महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Kalyan crime: कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
Embed widget