Maharashtra News LIVE Updates : संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यात काँग्रेस नेत्यांची पाठ
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बाळासाहेबांसाठी माझा हात नेहमी पुढे, आमची भूमिका प्रामाणिक : नाना पटोले
प्रकाश आंबेडकरांसाठी माझा हात नेहमी पुढे आहे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. आमच्यासाठी संविधान सर्वोपरी आहे. त्यासाठी सर्व मानापमान बाजूला ठेवू असे मन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं. आम्ही पण हिंदू आहोत, आम्हाला पण धर्माचा अभिमान आहे पण धर्माचा वापर राजकारणासाठी करणार नाही असे पटोले म्हणाले.
पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने संपवल जीवन, पुण्यातल्या लोहियानगरमधील घटना
पुण्यात पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली
खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
लोहिया नगर पोलीस चौकीत केली आत्महत्या
पुणे पोलीस दलातली कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली
भारत दत्ता अस्मर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून आज पहाटे त्याने आत्महत्या केल्याचे समजत आहे
























