एक्स्प्लोर

तर दोन दिवसाआड लातूरकरांना पाणी पाजले असते...प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या अनास्थेपुढे हतबल महापौरांची धक्कादायक माहिती

लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातोय. मागील अनेक वर्षांपासून शहराला आठ दिवसात दोन वेळा तरी पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे.

लातूर  : लातूर शहर मनपाकडून दिवसाला पाणीपुरवठा होत असतो ही बाबच लातूरकर विसरले आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून 8 दिवसातून एकदा पाणी नळाला ही सवय त्यांना लागली आहे. मात्र, सध्याच्या पिवळ्या पाण्यामुळे मनपाचे अनेक रंग बाहेर पडत आहेत. दस्तुरखुद्द महापौर यांनीच लातूर शहराला दोन दिवसाआड पाणी शक्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता हे खरंच शक्य आहे का? हा संशोधनाचा विषय बनला आहे. केवळ कर्मचारी आणि प्रशासकीय अनास्था असल्यामुळे लातूरकरांना दोन दिवसाआड पाण्याऐवजी आठ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची खळबळजनक कबुली महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आज दिली.

Latur Water Crisis : लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातोय. मागील अनेक वर्षांपासून शहराला आठ दिवसात दोन वेळा तरी पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. मनपातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाने याला मंजुरी दिली होती. लवकरच दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल, असेही ठरले. त्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली होती. प्रायोगिक तत्वावर यंत्रणा कार्यरत होईल का नाही यांच्यावर कामही करण्यात आले होते. सर्व सिद्धता झाली असताना ही प्रशासकीय यंत्रणेतील अनागोंदी कारभारामुळे सर्व सिद्धता असतानाही दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत नाही.

मांजरा धरणात आजमितीला मुबलक पाणी आहे, असे असताना ही लातूरकरांना मात्र अद्याप पाण्यासाठी आठ-आठ, दहा-दहा दिवस वाट पाहवी लागत आहे. यामागे प्रशासकीय अनास्था असल्यामुळे आम्ही धोरण तयार केले मात्र कार्यान्वित होत नाही. मनपातील कर्मचाऱ्यात एकवाक्यात आणि समन्वयचा अभाव आहे. याचा परिणाम आमच्या निर्णयावर झाला आहे, असा खेद महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली आहे.
      तर दोन दिवसाआड लातूरकरांना पाणी पाजले असते...प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या अनास्थेपुढे हतबल महापौरांची धक्कादायक माहिती
आम्ही दोन दिवसाआड पाणी देत ही होतो. मात्र तीन सायकलही पूर्ण झाले नाहीत आणि ओरड सुरू झाली. दोन दिवसाआड पाणी देताना पाणी पुरवठा करण्याचा वेळ हा एक ते दीड तासांवर आणला होता. मात्र काही भागात तीन तास पाणी देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली. त्या मागणीवर काही लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. दीड तासात पाणीसाठा करणे शक्य नाही असे कारण देत या प्रयोगास संपविण्यासाठी काम करण्यात आले. 
       
दोन दिवसाआड पाणी देताना फिल्टर टॅंक, पाण्याची टाकी, पाणी सोडणारे कर्मचारी हे सतत कार्यरत असावे लागतात. यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखरेख असली पाहिजे. मात्र कोणासही याकडे लक्ष देण्याची इच्छा नसल्यामुळे सर्व सिद्धता असतानाही पाणीपुरवठा करता येत नाही हे खेदाने सांगण्याची वेळ आली आहे, असे ही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी स्पष्ट केले.

तर दोन दिवसाआड लातूरकरांना पाणी पाजले असते...प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या अनास्थेपुढे हतबल महापौरांची धक्कादायक माहिती
      
 पिवळ्या पाण्याचा विषय मार्गी

मागील काही दिवसांपासून लातूर शहराला पिवळे आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा धरणात खोलवर भागातील आहे. या ठिकाणी उन्हाळा आणि पाण्याच्या विसर्गामुळे काही वेगळी स्थिती निर्माण झाली होती.मात्र ती स्थिती लातूर एमआयडीसीच्या पाणीपुरवठा लागू होत नाही कारण त्याच्या पाण्याच्या मोटार हा वरील भागात आहे. ही अडचण फक्त लातूर शहर पाणीपुरवठा योजनेला होत आहे.

मांजरा धरणातून कळंब शहराला ही पाणीपुरवठा होतो. काही दिवसांपूर्वी त्यांना ही अशी समस्या आली होती. 2016 साली बारामतीमध्येही याच कारणांमुळे पिवळं पाणी नळामधून आल्याचा दावा महापौरांनी एक वृत्तपत्र कात्रण दाखवून केला आहे. अनेक धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत या समस्या आहेत. लातूर शहरातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पातील यंत्रणामध्ये काही बिघाड होते. या सर्वांवर उपाययोजना करण्यात आली आहे. आता समस्या सोडविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात सर्व काही व्यवस्थित होईल, असा विश्वास ही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केला आहे.

महापौरांची राजकीय कुचंबणा 

गेल्या अडीच वर्षांपूर्वी महापौर पदाचा पदभार स्वीकारलेल्या महापौरांना प्रतिस्पर्धक समजून  राजकीय दबावाचा सामना करावा लागत असल्याची दबक्या सुरात चर्चा होती.  मनपात महापौरांना कारभारात मोकळीक नाही हे वारंवार माध्यमांसमोर आलेल्या 'पालकमंत्रीजी से बात करो...!' या परवलीच्या वाक्याने जाणवत होते. त्यावर आज महापौरांच्या हतबल कबुलीने जणू शिक्कामोर्तब झाले आहे. पाणीपुरवठ्याचे श्रेय कोणाचे हा देखील विषय त्यातच आला. मात्र लातूरकरांना या वादामुळे पाणी मिळत नाही हे स्पष्ट झाले आहे 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget