Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा, 25 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश
Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rashmi Shukla : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) निर्देश देण्यात आले आहेत. रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान रश्मी शुक्ला यांनी राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप
रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता. याप्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.
अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला
रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्याचा गैरवापर केला. शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोनसुद्धा टॅप केले असल्याचा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा ठपका त्यांच्यावर करण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Budget Session LIVE: अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
