एक्स्प्लोर

धक्कादायक आकडेवारी! गेल्यावर्षी मराठवाड्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

Farmer Suicide: एकट्या 2022 मध्ये मराठवाड्यात तब्बल 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्याचे समोर आले आहे.

Farmer Suicide: कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी नेहमीच संकटात सापडताना पाहायला मिळतो. त्यामुळे नापिकी आणि आर्थिक परिस्थितीमुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवत आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा वर्षोनुवर्षे वाढत चालला आहे. 2020 पासून 2022 पर्यंतचा आकडा मन सुन्न करणारा आहे. एकट्या 2022 मध्ये मराठवाड्यात तब्बल 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक 202 आत्महत्या बीड जिल्ह्यात (Beed District) झाल्या आहेत. 

राज्यात सत्तेत आलेला प्रत्येक सत्ताधारी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलणार असल्याचा दावा करतात. मात्र गेल्या तीनवर्षांची आकडेवारी पाहिली असता, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे समोर आले आहे. 2019 मध्ये मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा 730 च्या आत होता, परंतु 2020 मध्ये 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर 2021 मध्ये तब्बल 887 जणांनी मृत्यूला कवटाळले होते. आता हा आकडा वाढून 2022 मध्ये 1हजार 23 झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आत्महत्या मागच्या वर्षात झाल्याचं समोर आले आहे. 

सलग तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना...

कधीकाळी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणारे चित्र असलेल्या मराठवाड्याला दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागायचा. पण आता त्याच मराठवाड्यात गेली तीन वर्षे अतिवृष्टी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातून जात आहे. तर रब्बीच्या पेरणी होताच परतीचा फटका बसतो. त्यात महावितरणकडून वीज कापल्याने उरल्यासुरल्या पीकांना पाणी भरता न आल्याने ते जळून जातात. गेल्या तीन-चार वर्षात मराठवाड्यात जणू हे समीकरण बनलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हतबल झालेला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवत आहे. मात्र 2022 मध्ये हा आकडा मोठ्याप्रमाणावर वाढला असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. 

2022 मधील शेतकरी आत्महत्या आकडेवारी 

अ.क्र. जिल्हा  शेतकरी आत्महत्या 
1 औरंगाबाद  180
2 जालना  125
3 परभणी  77
4 हिंगोली  44
5 बीड  220
6 लातूर  63
7 उस्मानाबाद 117
8 नांदेड  147
  एकूण  1023

Aurangabad News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी एल्गार; संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेतSpecial Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget