Maharashtra News: प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काल अडीच तास बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra News: मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकरांची मुंबईत अडीच तास चर्चा झाली. या चर्चेत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
मुंबई : प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री बंद दाराआड अडीच तास बैठक झाली आहे. बैठकीत राजकीय चर्चा झाली असून प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटासोबत युती करू नये असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकरांना केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर ठाकरे गटासोबतच्या युतीवर ठाम असल्याचीही माहिती समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकरांची मुंबईत अडीच तास चर्चा झाली. या चर्चेत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. चर्चेत आंबेडकरांच्या ठाकरे गटासोबतच्या आघाडीवर आंबेडकरांचं मन वळविण्याचा शिंदेंनी प्रयत्न केला आहे. यापूर्वी देखील 16 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत आले तर राज्यातील इतरही दलित नेते सोबत येणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीतील मुद्दे
- प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटासोबत युती करू नये, मुख्यमंत्र्यांचा आंबेडकरांना आग्रह
- प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत येण्याचाही आग्रह धरल्याची माहिती
- प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत आले तर राज्यातील इतरही दलित नेते सोबत येणार असल्याची शक्यता
- राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा
- प्रकाश आंबेडकर ठाकरे गटासोबतच्या युतीवर ठाम असल्याची माहिती
प्रकाश आंबेडकर यांनी आपण उद्धव ठाकरेसोबत असल्याचं जाहीर केलं होतं. तरी देखील काल प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरू आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजगृहावर जाऊन प्रकाश आंबेडकरांना भेटले होते. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणीही केली होती. आता कालच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय? असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मागील काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पाडली होती. प्रकाश आंबडेकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमधील जागा वाटपाबाबत भाष्य देखील केले होते. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते की, शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चर्चा करण्याआधी आम्ही 83 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. आता, चर्चेनंतर शिवसेना आम्हाला जेवढ्या जागा सोडेल त्यावर आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले