(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Who is Pravin Chavhan : देवेंद्र फडणवीसांनी नाव घेतेलेले प्रविण चव्हाण कोण आहेत?
Pravin Chavhan : गिरीश महाजनांना खोट्या प्रकारणांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा जो आरोप केला आहे त्या आरोपाच्या केंद्रस्थानी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आहेत. आरोप केलेले प्रवीण चव्हाण कोण आहेत?
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार गिरीश महाजनांना खोट्या प्रकारणांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा जो आरोप केला आहे त्या आरोपाच्या केंद्रस्थानी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आहेत. देवेंद्र फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनचे जे व्हिडीओ सादर केलेत त्यामध्ये प्रवीण चव्हाण अनेक वरिष्ठ नेत्यांची नावं घेताना दिसत आहेत.
प्रवीण चव्हाण कोण आहेत?
- महाराष्ट्रातील अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये प्रवीण चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलंय.
- जळगावमधील घरकुल घोटाळा ज्यामध्ये सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यासारख्या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं त्या प्रकरणात प्रवीण चव्हाण विशेष सरकारी वकील होते.
- हजारो कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या जळगाव जिल्ह्यातील भायचंद हिराचंद रायसोनी अर्थात बी एच आर पतसंस्थेच्या प्रकरणात प्रवीण चव्हाण सरकारी वकील आहेत.
- पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांच्यावर हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा जो गुन्हा दाखल आहे त्या प्रकरणात प्रवीण चव्हाण सरकारी वकील म्हणून काम पाहतात.
- खंडणीच्या ज्या प्रकरणात आर टी आय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला अटक करण्यात आली त्या प्रकरणात देखील प्रवीण चव्हाणच सरकारी वकील म्हणून काम पाहतात.
- ज्या प्रकरणात गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्या प्रकरणातही प्रवीण चव्हाण हेच विशेष सरकारी वकील आहेत .
- देवेंद्र फडणवीसांनी आरोप केल्यानंतर प्रवीण चव्हाण हे त्यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनीतील कार्यालयाला कुलूप लावून निघून गेले आहेत .
प्रवीण चव्हाण हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील आहेत . आता याला योगायोग म्हणा किंवा आणखी काही .. घरकुल घोटाळा , बी एच आर घोटाळा आणि आताचे गिरीश महाजनांचे प्रकरण या जळगाव जिल्ह्यातील तिन्ही महत्वाच्या प्रकरणांमध्ये प्रवीण चव्हाण हेच सरकारी वकिल राहिले आहेत.
खटल्यातील आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचवण्याची प्रवीण चव्हाण यांची ख्याती राहिल आहे . भले ते आरोपी कितीही मोठे असो पण आता प्रवीण चव्हाण यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. न्यायालयात बिनतोड युक्तिवाद आणि जोरकसपणे बाजू मांडण्यासाठी प्रवीण चव्हाण ओळखले जातात . आता हेच कौशल्य त्यांना स्वतःची बाजू मांडण्यासाठी वापरावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण
Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर