Chhatrapati Sambhaji Nagar News: आधी शाब्दिक चकमक, त्यानंतर दोन्ही गट भिडले; छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात पंधरा जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठण तालुक्यातील थेरगाव येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत थेट लाठ्या-काठ्या व दगडाने झालेल्या तुंबळ हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहावाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, ज्यात आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात पंधरा जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील थेरगाव येथील शेख याकूब कडूभाई व शेख नजीर अब्दुल यांची आजूबाजूला शेती आहे. तर दोघांना शेतात ये जा करण्यासाठी गाडी रस्ता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी गावातील शेख इस्माईल यांनी या जमिनीच्या नाल्यात मुरूम टाकला होता. त्यामुळे शेख नजीर व त्याचे कुटुंबीय शेख याकूब यांच्याकडे गेले आणि मुरूम उचलून घेण्याचं सांगितले. मात्र आम्ही तो मुरूम टाकला नसून, ज्यांनी टाकला आहे त्यांना उचलून घेण्याचो सांगतो असे शेख याकूब यांनी शेख नजीर यांना म्हटले. दरम्यान यावरूनच दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आणि पुढे या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत सुरु झाले.
यावेळी झालेल्या हाणामारीत शेख याकूब यांच्या गटाचे शेख सायराबी याकूब, हीना युसूफ, शेख युसूफ याकूब, शेख याकूब कडू जखमी झाले आहेत. तर शेख नजीर अब्दुल यांच्या गटातील शेख नजीर, जमस्तबी नजीर, युनूस दगडू, मदीनावी दगडू व शेख बादशाह अब्दुल हे जखमी झाले. दरम्यान या हाणामारीत सायराबी यांचं डोकं फुटले असून, शेख नजीर यांच्या कानावर दगड मारल्याने कानातून रक्तस्राव झाला. दरम्यान सर्व जखमींना उपचारासाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर शेख सायराबी याकूब व शेख नजीर अब्दुल या दोघांना शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांची घटनास्थळी धाव...
दरम्यान थेरगाव येथे दोन गटात वाद झाला असून जोरदार हाणामारी झाल्याची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी रुग्णालयात आणि थेरगावात धाव घेतली. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून एकमेकांविरुद्ध एकूण 15 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर जखमींवर उपचार सुरु आहे. तर शेख याकूब याचा मुलगा शेख युसूफ याच्या तक्रारीवरून शेख मुनाबी शेख बादशहा, शेख युनूस दगडू शेख जावेद दगडू, नजीर अब्दुल, शेख जमरुतबी नजीर शेख हीना जावेद शेख हसीना युनूस शेख युसूफ नजीर शेख बादशहा अब्दुल, शेख जाबेर नजीर (सर्व रा. धेरगाव) या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शेख नजीर याचा भाऊ शेख बादशाह अब्दुल याच्या तक्रारीवरून शेख याकूब कडु, शेख युसूफ याकूब, शेख आयुब याकूब शेख हीना युसूफ, शेख सायराबी याकूब या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहिते, ताराचंद घडे करोत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Bees Attack: वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; 15 ते 20 जण जखमी