एक्स्प्लोर

APMC Election : कन्नड बाजार समितीवर रावसाहेब दानवेंच्या मुलीचं वर्चस्व; हर्षवर्धन जाधवांच्या पॅनलचा धुव्वा उडाला

APMC Election 2023 Result : माजी आमदार तथा बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांना एकही जागा जिंकता आली नाही.

APMC Election 2023 Result : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) कन्नड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कन्या संजना जाधव यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 16 जागा जिंकत कन्नड बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाविकास आघाडी आणि आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. तर माजी आमदार तथा बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांनाही एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत नितीन पाटील गटाचे 13 पैकी 11 तर संजना जाधव गटाचे 5 पैकी 5 उमेदवार विजयी झाले आहे. तर सोसायटी मतदार संघातून भाजपचे किशोर पवार व  हमाल तोलारी मतदारसंघात अपक्ष उमेदवार शेख युसुफ विजयी झाले आहे. 

कन्नड बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व संजना जाधव गट, महाविकास आघाडी, स्वाभिमानी आणि आप पार्टी, भाजप आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव, असे पाच पॅनल उभे आसल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत व राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. यात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. तर खुद्द आमदार राजपूत यांच्या मूळ गावी नागद येथे आसलेल्या मतदान केंद्रावर फक्त चार मतदान मिळाल्याने त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला.  तर हर्षवर्धन जाधव यांना देखील एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. 

निवडून आलेले उमेदवार 

सहकारी संस्था 

साधारण गट: कैलासअकोलकर, साईनाथ अल्हाड, गोकुळसिंग राजपुत, युवराज चव्हाण, देविदास  मनगटे, शिवाजी  थोरात (शिवशाही शेतकरी विकास पॅनल), किशोर नारायणराव पवार ( भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनल)

सहकारी संस्था महिला राखीव 

सुलोचनाबाई पवार,  अनिता शेलार (शिवशाही शेतकरी विकास पॅनल)

सहकारी संस्था इ.मा. प्रवर्ग 

कांताराम सोनवणे, सहकारी संस्था वि.जा./भ. ज. - मनोज राठोड (शिवशाही शेतकरी विकास पॅनल)

ग्राम पंचायत मतदारसंघ 

चंद्रभान गोरे, बाळासाहेब राऊबा जाधव (साधारण), जयेश बोरसे (दुर्बल घटक) , व्यापारी मतदार संघ : अब्दूल जावेद अ. वाहेद, प्रकाश अग्रवाल (शिवशाही शेतकरी विकास पॅनल), हमाल तोलारी : शेख युसुफ शेख मुनीर (अपक्ष) या प्रमाणे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

APMC Election 2023: वैजापूर बाजार समिती भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; आमदार बोरनारेंनी बाजी मारली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case : सीसीटीव्हीत केज शहरात आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आल्या असल्याचं उघडABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Walmik Karad: वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले
वाल्मिक कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी-पोलीस एकत्र दिसले
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Beed Bank Scam: बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर एमपीआयडीची कारवाई; ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊल
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Embed widget