मोठी बातमी! बीआरएस महाराष्ट्रात विधानसभेच्या संपूर्ण 288 जागा लढवणार; तेलंगणाच्या सीएमओ कार्यालयात बैठक
Maharashtra Politics: विशेष म्हणजे, या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) स्वतः उपस्थित होते.
Maharashtra Politics: एकीकडे राज्यातील राजकारण (Politics) वेगवेगळ्या कारणानं तापलं असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारणात नव्यानं एन्ट्री करणाऱ्या बीआरएस (BRS) पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी थेट तेलंगणाच्या सीएमओ कार्यालयात बैठका होत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा लढवण्याबाबत बीआरएस पक्षाकडून निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) स्वतः उपस्थित होते. तर राज्यातील अनेक बीआरएस पक्षाचेनेते देखील या बैठकीत होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान, याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून सुरु केली आहे. त्यामुळे नांदेडसह छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांनी आतापर्यंत तीन जाहीर सभा देखील घेतल्या आहेत. तर पक्षात अनेक माजी आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी प्रवेश केला आहे. तर या पक्षाकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. तर नुकत्याच झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा लढवण्याबाबत बीआरएस पक्षाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
विधानसभेच्या 288 जागा बीआरएस महाराष्ट्रामध्ये लढवणार
दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथील हैदराबाद सीएमओ कार्यालयात महाराष्ट्रातील विधानसभा लढवण्याबाबत दोन सत्रामध्ये बीआरएस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीसंदर्भामध्ये सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याच बैठकीमध्ये विधानसभेच्या 288 जागा बीआरएस महाराष्ट्रामध्ये लढवणार आहे. या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह माजी आमदार, खासदार यांच्यासह महाराष्ट्रचे प्रभारी जीवन अण्णा रेड्डी उपस्थित होते. तसेच यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
अनेक नेतेमंडळी पक्षाच्या गळाला...
राज्यात बीआरएस पक्षाकडून एन्ट्री होताच या पक्षाने अनेक महत्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील अनेक महत्वाचे नेते बीआरएसच्या गळ्याला लागले आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बीआरएसमध्ये दाखल झाले आहेत. तसेच आगामी काळात आणखी काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे बीआरएस पक्ष आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागलं असल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :