एक्स्प्लोर

Bacchu Kadu on Cabinet Expansion : न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या; बच्चू कडू यांचा खोचक टोला

Bacchu Kadu on Cabinet Expansion : आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळावर बोलतांना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपल्या भावना बोलून दाखवली आहे.

Bacchu Kadu on Cabinet Expansion : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र हा विस्तार कधी होणार याबाबत शिक्कामोर्तब मात्र काही होत नसल्याने इच्छुकांचा हिरमोड होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपल्या भावना बोलून दाखवली आहे. न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या असल्याचं बच्चू कडू म्हणाले. 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या अनेक तारखा झाल्या आहेत. एवढंच नाही तर न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या आहेत. दोन महिने झाले की, माध्यमांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या पाहायला मिळतात. त्यानंतर आम्हाला अनेक अभिनंदनाचे फोन आले. त्यामुळे एकदाची काय ती भानगड मिटवून टाकली पाहिजे. सरकारने स्पष्टपणे मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यास तसे सांगितले पाहिजे. त्यामुळे कोणाची नाराजी राहणार नाही. पण विस्तार करायचा असल्यास एक घाव दोन तुकडे करून टाकले पाहिजे. तर जेवणाचे आमंत्रण दिले जाते पण जेवणाराच गायब राहते, असे होऊ नयेत." 

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "जनतेसाठी देखील हा निर्णय घेतला पाहिजे. आपण जर पाहिले एका मंत्र्याकडे चार-चार जिल्ह्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले आहे की हा सर्व भार जास्त होत असून, विस्ताराची गरज आहे." त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची अपेक्षा असल्याचं बच्चू कडू म्हणाले. 

लगेच मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे काय मला काही समजत नाही...

मंत्रिमंडळ केल्यावर नाराज असलेले लोक पक्ष सोडून जातील असे काही नाही. विस्तार केल्यावर जातील किंवा नाही केला म्हणून राहतील असा काही विषय नाही. काही टेक्निकल कारण होते. न्यायालयाचे कारण होते. मात्र आता काही कारण राहिले नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की, आम्ही मंत्रिमंडळ विस्तार लगेच करणार आहे. पण लगेच म्हणजे काय मला काही समजत नाही, असा खोचक टोलाही बच्चू कडू यांनी यावेळी लगावला. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या चर्चा रंगू लागल्या असून, यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहे. पण प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bacchu Kadu On Cabinet Expansion : 20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, मलाही मंत्रिपद मिळणार : बच्चू कडू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशाराDhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिकDhananjay Mahadik Ladki Bahin | पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो पाठवा, व्यवस्था करुAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : निकालानंतर सत्तेत सहभागी होणार, Imtiaz Jaleel Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Shrirampur : राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
राधाकृष्ण विखेंच्या तंबीनंतरही शिंदे गटाचा उमेदवार म्हणतो, मीच अधिकृत, मुख्यमंत्री माझ्यासाठी सभा घेणार
Ajit Pawar on Jayant Patil : कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
कारखानदाराने दिवाळीमध्ये पैसे दिले नाहीत, अरे मुख्यमंत्रीपदाच्या गप्पा कशाला मारता? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा हल्लाबोल!
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Embed widget