एक्स्प्लोर

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना संधी मिळणार का?; समर्थकांना अजूनही अपेक्षा

Pankaja Munde: यापूर्वी पंकजा मुंडे यांना अनेकदा डावलण्यात आले होते. त्यामुळे यावेळी त्यांना मंत्रीमंडळात संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis Ministry: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच सरकार कोसळले. त्यांनतर आज रात्री किंवा उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मात्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप फडणवीसांवर केला जातो. त्यामुळे यावेळी तरी मुंडे यांना संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना लागली आहे. 

कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पल्लवीत...

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यांनतर महाविकास आघाडीच सरकार आल्याने भाजपवर विरोधी पक्षात जाऊन बसण्याची वेळ आली. मात्र त्यांनतर सुद्धा पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत संधी मिळेल असे बोलले जात होते. पण प्रत्येकवेळी त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे आता अडीच वर्षांनी पुन्हा एकदा भाजपच सरकार स्थापन होत असून, फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे यावेळी तरी पंकजा यांना संधी दिली जाईल अशी अपेक्षा मुंडे समर्थकांना आहे. मात्र नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा नसल्याचे पाहायला मिळत आहे.

संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती आली आहे.  

कॅबिनेट 

देवेंद्र फडणवीस 
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील
संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे  
डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित 
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे
विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके 
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर

शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत
कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर

राज्यमंत्री
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget