एक्स्प्लोर

Aurangabad: फेसबुकवरून ओळख झालेल्या प्रियकरानेच रचला प्रियेसीच्या पतीच्या खुनाचा कट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Aurangabad Crime: हत्या केल्यावर तीन वेळा घटनास्थळी जाऊन आरोपी प्रियकर आणि प्रियेसीने पाहणी केली.

Aurangabad Crime News Update: पतीला मनसोक्त दारू पाजून त्यानंतर त्याच्यावर पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढल्याची घटना शनिवारी समोर आली होती. मात्र पोलीस तपासात यात आणखी नवीन खुलासा झाला असून,  फेसबुकवरून ओळख झालेल्या प्रियकरानेच प्रियेसीच्या पतीच्या खुनाचा कट रचला असल्याचे समोर आले आहे. विजय संजयकुमार पाटणी (35, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव असून, पत्नी सारिका विजय पाटणी (30, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (25 रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

विजय आणि सारिका या दोघांमध्ये पटत नसल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विजय त्याच्या वृद्ध आईसह आणि सारिका तिच्या आई व भावासह राहू लागले होते. यादरम्यान, सारिकाची फेसबुकवरून सागरशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. याचकाळात विजय सारिकासोबत पुन्हा एकत्र राहण्याचा हट्ट करायला लागला. त्यामुळे सागरने विजयचा काटा काढण्याचं ठरवलं. 

असा रचला कट...

विजयकडून सुरु असलेल्या त्रासाबद्दल सारिकाने सागराला सांगितले. त्यामुळे दोघांनी मिळून विजयच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे विजयला कांचनवाडी उड्डाणपुलाजवळ सारिकाने आणले. त्यानंतर विजयचा खून करण्यात आला. हत्या केल्यानंतर आरोपी सागर आणि सारिका यांनी विजयची दुचाकी त्याच रात्री थेट शिर्डी येथे नेऊन सोडली. जाताना त्यांनी रक्ताने माखलेले कपडे जाळले टाकले आणि  हत्येसाठी वापरलेला चाकू फेकून दिला. दुकानातून नवीन ड्रेस घेतले. दुसऱ्या दिवशी ते बसने पंढरपूर चौकात उरतले. तेथून रिक्षाने पुन्हा खुनाच्या घटनास्थळी आले. तेथून सागरची दुचाकी घेऊन ते आपआपल्या घरी गेले. 

तीन वेळ घटनास्थळी पाहणी केली... 

विजयची हत्या केल्यावर सागर आणि सारिकाने त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकून दिला. मात्र त्यानंतर जवळपास तीन वेळा घटनास्थळी जाऊन ते माहिती घेत राहिले. तोपर्यंत विजयच्या खुनाची घटना उघडकीस आली नव्हती. विशेष म्हणजे याच काळात सारिकाने एमआयडीसी वाळूज ठाण्यात विजयच्या बेपत्ताची नोंद केली होती. मात्र विजयाचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सागर व सारिका यांनी केलेला कारनामा समोर आणला. 

Crime: फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला कायमचं संपवलं, कारण होतं...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
नादच खुळा...  इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
नादच खुळा... इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaKirit Somaiyya Mumbai : Pune Metro : पुणे मेट्रोचा अंडरग्राऊंड रिपोर्ट, मोदींच्या हस्ते होणात उद्धाटनSunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
नादच खुळा...  इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
नादच खुळा... इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
CJI Sarosh Homi Kapadia : शिपाई ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ! असा प्रवास करणारी व्यक्ती आहे तरी कोण?
शिपाई ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ! असा प्रवास करणारी व्यक्ती आहे तरी कोण?
श्रीगोंदा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, शरद पवार कुणाला तिकीट देणार?
श्रीगोंदा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, शरद पवार कुणाला तिकीट देणार?
देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना वचन; हमीभावापेक्षा अधिक दराने होणार कापूस, सोयाबीनची खरेदी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना वचन; हमीभावापेक्षा अधिक दराने होणार कापूस, सोयाबीनची खरेदी
'वर्षभर आम्ही झुंडशाही बघतोय', ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा एल्गार, म्हणाले,''आता ॲक्शन रिॲक्शन होणारच''
'वर्षभर आम्ही झुंडशाही बघतोय', ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा एल्गार, म्हणाले,''आता ॲक्शन रिॲक्शन होणारच''
Embed widget