एक्स्प्लोर

Politics: उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे; केला गंभीर आरोप...

Maharashtra Political Crisis:: यापूर्वी बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली होती.

Maharashtra Political Crisis: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतरही आरोप प्रत्यारोप काही थांबायला तयार नाहीत. तर शिवसेना आणि बंडखोर आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पाहायला मिळत आहे. माजी मंत्री तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, 'माझ्या पैठण मतदारसंघामधील पर्यटन विकासासाठी मी आदित्य ठाकरेंना पाच-पाच पत्रे दिली, मात्र ते एकदाही भेटून त्याबद्दल बोलले नसल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे. 

बंडखोरीनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच परतलेल्या भुमरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचे कारण सांगितले. तसेच कधीही कुणावर उघडपणे टीका न करणारे भुमरे यांनी यावेळी मात्र आपल्या मनातील खदखद स्पष्टपणे मांडली. यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, 'मी पैठण मतदारसंघातील पर्यटन विकासासाठी पाच कोटींच्या निधीची मागणी केली होती. यासाठी आदित्य ठाकरेंना पाच-पाच पत्रे दिली. पण आदित्य ठाकरेंनी निधी देणे सोडा, पैठणला साधी भेटही दिली नाही. त्यांनी किमान दौरे तरी करायला हवे होते, असे भुमरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे सुद्धा भेटण्यासाठी वेळ देत नव्हते असेही भुमरे म्हणाले. 

खैरेंनाही दिले उत्तर...

बंडखोर आमदारांनी सात हजार कोटी घेतल्याच्या खैरेंच्या आरोपाला उत्तर देतांना भुमरे म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांचे आरोप बिनबुडाचे आहे. त्यांच्या आरोपांना किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे. तर पैसे घेतल्याचा आरोप करणारे खैरे साहेबांनी सात हजार कोटी कशाला म्हणतात हे लिहून दाखवावे, असा खोचक टोला भुमरे यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या कोणत्याही आमदाराने पैसे घेतले नसून, ते फक्त प्रेमाखातर त्यांच्यासोबत गेल्याचं भुमरे म्हणाले. त्यामुळे आमच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणारे चंद्रकांत खैरे हे सुद्धा लवकरच आमच्यासोबत येतील असेही भुमरे म्हणाले. 

संबंधित बातम्या 

Aurangabad: 'पाय माझे जमिनीवर,नजर माझी...; भूमरे यांच्या पत्नीने घेतला उखाणा

Politics: 'लोकांना मिरची लागेल अशा पोस्ट सोडा'; भूमरेंचा 'तो' फोन कॉल व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊतChhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget