एक्स्प्लोर

मराठवाडा विद्यापीठात दीक्षान्त समारंभ; गडकरी, शरद पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एकाच मंचावर

Aurangabad: आज मराठवाडा विद्यापीठाचा आज 62 वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

Aurangabad News: औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाकडून (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डी. लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज नितीन गडकरी, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक एकाच मंचावर उपस्थित होते. आज मराठवाडा विद्यापीठाचा आज 62 वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा समारंभ पार पडला असून, 'सुपर कॉम्प्युटर' चे जनक विजय भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला. तर यावेळी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट. प्रदान करण्यात आले. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा आयोजित करण्यात आलेल्या दीक्षान्त समारंभात 433 संशोधक विद्यार्थ्यांना यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आले. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 146, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र 48, मानव्य विद्या 163 व तर आंतरविद्या शाखांतील 76 संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  

पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा 

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, विद्यापीठाचा कालखंड आठवतोय. देशाला घटनेच्या माध्यमातून संशोधित प्रणाली दिली. याभागात शैक्षणिक प्रगती नसताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी  लक्ष घातले. मोलाची कामगिरी केली. त्या कालखंडात एक मर्यादा होत्या. शैक्षणिक संस्था म्हणलं की, अडचणी होत्या. त्यात औरंगाबादला शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा त्यांच्या निर्णयाने शिक्षणाचे मोठे जाळे उभे झाले. तर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अस कार्य केलं. यासाठी अनेक संघर्ष झाले. त्याची काही किंमत मला मोजावी लागली. दुसर विद्यापीठ उभं राहील त्याचा भाग मला होता आलं. मराठवाडा म्हणले की, शेती आणि सामान्य माणूस वेगळा संबंध आहे. 

पदवीच्या मी लायकीचा आहे का?: गडकरी 

यावेळी बोलतांना नितीन गडकरी म्हणाले, मराठवाडा संतांची भूमी, विद्यापीठ ज्ञानच मोठ केंद्र आहे. तेथील संशोधनं महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रगतीसाठी महाविद्यालयाची भूमिका महत्वाची असतें. त्यात काय बदल करावे यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असावं. तर ड्राय पोर्ट अनुषंगाने मराठवाडा विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करावे, शेतकऱ्यांना मदत होईल असे गडकरी म्हणाले. तर सामाजिक आर्थिक चळवळ विद्यापीठ मुळे होईल असा विश्वास आहे. तर विद्यापीठकडून देण्यात आलेल्या पदवीच्या मी लायकीचा आहे का हे माहीत नाही, असेही गडकरी म्हणाले. 

राज्यपालांचे वादग्रस्त विधान... 

दरम्यान यावेळी भाषण करतांना राज्यपाल यांनी केलेल्या एका विधानावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे.  'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला, यावेळी बोलतांना कोश्यारी यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका देखील होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget