औरंगाबादकरांसाठी खूशखबर! लवकरच म्हाडाच्या 828 घरांची लॉटरी, स्वस्तात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार
Mhada Lottery: म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे 828 सदनिका, भूखंडाकरीता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Mhada Lottery: आपल्या हक्काचं घर असावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र घरांच्या वाढत्या किंमती पाहता घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. पण आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) राहणाऱ्या आणि घराचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगाबाकरांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तर म्हाडाच्या (Mhada) माध्यमातून औरंगाबादकरांना स्वस्त किमतीमध्ये आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकणार आहे. कारण म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे 828 सदनिका, भूखंडाकरीता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (Aurangabad Mhada Lottery 2023)
म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे 828 सदनिका, भूखंडाकरीता लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोडतीत भाग घेण्याकरीता किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतंर्गत (म्हाडा) राबविण्यात येणाऱ्या विविध गृहनिर्माण योजनांसाठी नवीन एकात्मिक लॉटरी प्रणाली 2.0 (HLMS 20.) अद्यावत केलेली आहे. यामध्ये अर्जदाराच्या कागदपत्राची पडताळणी ही सोडतीपूर्वीच करण्यात येणार आहे. यात पात्र होणारे अर्जदारच सोडतीमध्ये सहभाग नोंदवू शकतात.
कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे यांची संख्या कमी करुन 7 एवढी करण्यात आलेली आहे.
ही प्रणाली शासनाच्या विविध डेटाबेस सोबत जोडलेली आहे, ज्यामध्ये सोडतीत नोंदणी करण्याकरीता आवश्यक असणारे आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र (आयकर परतावा प्रमापणत्र (ITR) वर्ष 2021-2022 किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा, जातीचा दाखला इत्यादीचा एपीआयचा वापर करुन अर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी सिस्टिम जमा करावी लागत होती. यात कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे यांची संख्या कमी करुन 7 एवढी करण्यात आलेली आहे.
अर्जदाराला आपल्या कागदपत्राची पडताळणी करुन द्यावी लागेल
सोडतीमध्ये नाव नोंदणी करणेकरीता सर्व अर्जदरांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. अर्जदारांनी गूगल प्ले स्टोअर (Play Store) किंवा ॲपल स्टोअर (App Store) वरून MHADA IHLMS 2.0 मोबाईल ॲप डाऊनलोड करावे किंवा https://housing.mhada.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी. यशस्वीरित्या नोंदणी करण्याकरीता अर्जदाराला आपल्या कागदपत्राची पडताळणी करुन द्यावी लागेल. यशस्वी पडताळणीनंतर अर्जदाराचे प्रोफाईल तयार होईल व अर्जदाराला स्वयंघोषणा पत्रावरती ई-सही करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पात्र अर्जदार म्हाडाच्या मंडळ निहाय (संपूर्ण विभागीय मंडळातंर्गत) सोडत योजना निवडणून अर्ज करु शकतात.
ऑनलाईन पद्धतीने रक्कमेचा भरणा करुन शकतात.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराला अनामत रक्क्म व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदार विविध पर्यांयाचा जसे की, नेटबँकीग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआयचा वापर करुन रक्कमेचा भरणा करुन शकतात. सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या अर्जदारांच्या अर्जाची ऑनलाइन सोडत काढण्यात येईल. सोडतीनंतरच्या प्रक्रिया जसे की, देकारपत्र, तारण नाहरकत प्रमाणपत्र, मुलाखतीची वेळ निश्चित करणे, वाटपपत्र, घराचे हफ्ते भरणा इत्यादी करीता या ॲपचा वापर करण्यात येत असल्यामुळे सोडत प्रक्रिया पुर्णपणे मानवी हस्तक्षेपाविरहीत करण्यात आलेली असून सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे, असे औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
संबंधित बातम्या:
MHADA : म्हाडाचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर! आता संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन