एक्स्प्लोर

HSC Exam: औरंगाबाद विभागात 430 केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा; अशी आहे मंडळाची तयारी

HSC Exam: विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा बारावीच्या परीक्षेसाठी बसणार आहे.

HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेची औरंगाबाद विभागीय मंडाकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी यंदा परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

नुकतेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले आहे. या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. बारावीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला असणार आहे. औरंगाबाद विभागीय मंडळाने या परीक्षेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. औरंगाबाद विभागीय मंडळातून 1 हजार 360 विद्यालयातील एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा 430 परीक्षा केंद्रावर होणार आहे.यासाठी 58 परिरक्षक केंद्र असणार आहे.

यावेळी असा असणार बदल! 

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर दहावीची परीक्षा 2  ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. मात्र यंदाच्या या बोर्डांच्या परीक्षेसाठी काही विशेष निणर्य घेण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या दहावी आणि बारावी होम सेंटर पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता 2021-22 मध्ये होम सेंटरचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता तशी परिस्थिती नसल्याने या दोन्ही परीक्षेत होम सेंटर पद्धत रद्द करण्यात आली आहे. या सोबतच दोन्ही परीक्षेदरम्यान यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. तर या परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. दरम्यान परीक्षेत कॉपी होऊ नयेत म्हणून, परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. 

जिल्हा  विद्यालय संख्या  परीक्षा केंद्र  परीक्षक केंद्र  नियमित विद्यार्थी 
औरंगाबाद  470 157 21 60400
बीड  298 101 15 38929
परभणी  233 59 08 24366
जालना  239 80 09 31127
हिंगोली  120 33 05 13441
एकूण  1360 430 58 168263

इतर महत्वाच्या बातम्या: 

HSC Exam 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! सराव परीक्षा दिल्याशिवाय यंदा अंतर्गत गुण नाहीच

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget