Crime News: दारूच्या नशेत वृध्दाने केलं असे काही भयंकर..., क्षणातच सर्व काही संपलं
Aurangabad News: दारूच्या नशेत टोकाचे पाऊल उचलत वृध्द कापुस व्यापाऱ्याने केली आत्महत्या.
Aurangabad Crime News: दारूच्या व्यसनाने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केल्याचा घटना नेहमीच समोर येत असतात. आता असाच काही प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे. दारूच्या नशेत एका वृध्द कापुस व्यापाऱ्याने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे उघडकीस आली. उत्तम हरी करडे (वय 75) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम करडे कापसाचा व्यापार करीत होते. मात्र त्यांचे वय झाल्याने त्यांची दोन मुले हे व्यापार पहात होते. तर उत्तम करडे हे सध्या घरीच राहत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासुन त्यांना दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे ते सतत नशेत राहत असत. त्यातुनच शनिवारी सायंकाळी त्यांनी घरातील पत्र्याच्या शेड मधील लोखंडी पाईल उपरणे बांधून गळफास घेतला, असल्याचे समोर आले आहे.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
करडे नेहमीप्रमाणे घरीच होते. तर रात्री शनिवारी सायंकाळी दारूच्या नशेत असतानाच त्यांनी घरातील पत्र्याच्या शेडला गळफास घेऊन अत्म्हत्या केली. हा प्रकार रात्री कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना फासावरून उतरवून बेशुध्द अवस्थेत घाटी रूग्णालयात आणले. मात्र रात्री पावणे बारा वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला...
दुसऱ्या एका घटनेत शेतात काम करण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आपतगाव येथे शनिवारी रात्री उघडकीस आली आहे. रेणुका राहुल कुबेर (वय 22 वर्षे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपतगाव येथे राहणारी रेणुकाचा तीन वर्षापूर्वी विवाह झालेला आहे. तिला एक मुलगा असून, रेणुका पतीला शेती कामात नेहमी मदत करीत असे. शनिवारी दुपारी देखील रेणूका शेतात काम करण्यास जात असल्याचे घरी न सांगून गेली होती. मात्र संध्याकाळ होऊन देखील रेणुका घरी आलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी व नातेवाईकांनी रेणूकाचा शोध घेणे सुरू केला. सर्व ठिकाणी शोधत असताना तिच्याच शेतातील विहिरी बाहेर रेणूकाची चप्पल पडलेली दिसली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला असता, रेणुका बेशुध्द अवस्थेत आढळून आली. त्यामुळे तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.