राज्यात बोगस विद्यार्थ्यांचा सुकाळ! 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस तर 29 लाखांची विनाआधार कार्ड नोंदणी
Maharashtra News : राज्यात 19 लाख विद्यार्थ्यांकडे बोगस आधारकार्ड तर 29 लाख विद्यार्थी विनाआधारकार्ड असल्याची माहिती शिक्षण विभागाने औरंगाबाद खंडपीठात सादर केली आहे.
![राज्यात बोगस विद्यार्थ्यांचा सुकाळ! 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस तर 29 लाखांची विनाआधार कार्ड नोंदणी Maharashtra news aurangabad 19 lakh students have Fraud Aadhaar card and Aadhaar card registration of 29 lakh students राज्यात बोगस विद्यार्थ्यांचा सुकाळ! 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस तर 29 लाखांची विनाआधार कार्ड नोंदणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/02/521e7b67f1fe23d3550fd70e23984ba7_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : राज्यात लाखो विद्यार्थी बोगस असल्याची आकडेवारी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने औरंगाबाद खंडपीठात सादर केल्याने खळबळ उडाली. दहा वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहिमेत 20 लाख बोगस विद्यार्थी सापडले होते. या बोगस विद्यार्थी संख्येला चाप लावण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली. तरीही बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही, उलट ती वाढली. विशेष म्हणजे यासाठी राज्यात 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्डच बोगस असल्याचे समोर आले आहे. तर 29 लाख विद्यार्थ्यांची विनाआधारकार्ड नोंदणीची आकडेवारी समोर आली आहे.
औरंगाबाद खंडपीठाच्या दणक्यानंतर आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि त्यातील घोळ समोर आला आहे. राज्यात तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. बीड जिह्यातील ब्रिजमोहन मिश्रा यांनी अॅड. सचिन देशमुख यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात खासगी शाळांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला होता. शिवाय राज्य सरकारची मोठी फसवणूक झाली असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. या याचिकेद्वारे बोगस विद्यार्थी संख्येची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी ऑनलाईन पद्धतीने आधारकार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला खंडपीठाने दिले होते. त्यात राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किती बोगस विद्यार्थी संख्या आहे?
- पुणे - 2,43,582
- नागपूर - 1,84,262
- जळगाव - 1,72,534
- नांदेड - 1, 52, 723
- यवतमाळ - 1, 17, 519
- बुलढाणा - 98, 488
- धुळे - 85, 157
- मुंबई - 80, 800
- नाशिक - 253
- अहमदनगर - 60, 951
- अकोला - 56, 478
- अमरावती - 5,107
- औरंगाबाद - 10, 666
- बीड - 8528
संबंधित बातम्या :
राज्यातील बोगस विद्यार्थी होणार उघड, परभणीत आढळले 14 हजार बोगस विद्यार्थी
राज्यात 24 लाख बोगस विद्यार्थी, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)