Maharashtra News: महाराष्ट्रात पाणीपट्टीत 30 टक्के वाढ; घरगुती, सिंचन, उद्योगांसाठीच्या पाणीदरात वाढ
महाराष्ट्रातील शेती सिंचन, घरगुती व औद्योगिक प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठीचे ठोक जल प्रशुल्क ज्याला पाणीपट्टी म्हणतात ते सुधारीत दर लागू होणार आहे.

मुंबई: येत्या काही महिन्यांत पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे, घरगुती, शेतीसाठी आणि उद्योगांसाठीच्याही पाणीपट्टीत वाढ करण्यात आलीय. एकीककडे काही भागात पुरेसा पाऊस पडलाय, तर काही भागांत अजूनही पावसाने पाठ फिरवलेलीच आहे. त्यातच, आता पाणीपट्टीची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे लोकांची तहान आता महागणार आहे.
महागाईचा फटका आता त्यात पाणीपट्टी वाढीचा झटका
1 ऑगस्टपासून उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी,उद्योगासाठी किंवा पाणीपुरवठ्यासाठी सोडण्यात येणारं पाणी 2025 पर्यंत 30 टक्के महागणार आहे. महाराष्ट्रातील शेती सिंचन, घरगुती व औद्योगिक प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठीचे ठोक जल प्रशुल्क ज्याला पाणीपट्टी म्हणतात ते सुधारीत दर लागू होणार आहे. पाणी वापरासाठीचे जलवर्ष 1 जुलै ते 30 जून असे असते. कोविड मुळे गेल्यावर्षी कुठलीही पाणीपट्टीत वाढ करण्यात आलेली नव्हती. सुधारित दर एक जुलै 2023 पासून पुढील तीन वर्षासाठी लागू असणार आहे.
शेतीसाठी पाणीपट्टीचे दर
अन्नधान्य
- खरीपासाठी प्रति हेक्टर 600 रुपये
- रब्बीसाठी प्रति हेक्टर 1200 रुपये
- उन्हाळी पिकं प्रति हेक्टर 1800 रुपये
फळबागा
- ऊस आणि केळी प्रति हेक्टर 5670 रुपये
- उन्हाळी खरीपासाठी 10890 प्रति हेक्टर
- रब्बीसाठी 3770 प्रति हेक्टर
फळपीक
- खरीपासाठी प्रति हेक्टर 1422 रुपये
- रब्बीसाठी प्रति हेक्टर 2844 रुपये
- उन्हाळीसाठी प्रति हेक्टर 4266 रुपये
यासोबतच नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही अधिकचा दर आकारला जाणार आहे. उद्योगांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठीहीअधिकचा कर आकारला जाणार आहे.
उद्योगांसाठी पाणीपट्टीचे दर
- प्रक्रिया उद्योग-एक हजार लिटरसाठी 11रुपये
- निर्मिती उद्योग-एक हजार लिटरसाठी 165 रुपये
- औद्योगिक घटक-घरगुती पाणी वापरासाठी 55 पैसे
पण प्रत्यक्षात आकारली जाणारी पाणीपट्टी आणि वसूल होणारी पाणीपट्टी याची आकडेवारी काय सांगते. 2008 ते 2018 मध्ये
- सिंचनासाठी (आकारलेली पाणीपट्टी)755 कोटी
- बिगर सिंचनासाठी ((आकारलेली पाणीपट्टी)) 1306 कोटी
- एकूण (आकारलेली पाणीपट्टी) 2061 कोटी पाणीपट्टी
प्रत्यक्षात (वसूल झालेली पाणीपट्टी) 968 कोटी
प्रकल्पाच्या देखभालीसाठी खर्च 1255 कोटी
याचा अर्थ पाणीपट्टीच्या वसूलीपेक्षा प्रकल्पाच्या देखभालीचा खर्च जास्त आहे
एकीकडे पाणीपट्टीमध्ये थेट 30 टक्के वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकरी…उद्योग जगताना नाराजीचे सूर उठू शकतात. पण दुसरीकडे महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये नेमकं किती पाणी उपलब्ध आहे? कोणत्या धरणामध्ये किती पाणी साठा होतो ? कमांड एरियात पाणी किती? कमांड एरियात ऊस किती यापैकी कशाचीही नोंद नाही त्यामुळे पाण्यावरून सावळा गोंधळ आहे असा अक्षेप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
