एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra new restrictions : रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी,महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद?
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत नवे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
काय सुरू राहणार?
- लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
- अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
- सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
- शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
- नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.
- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार.
काय बंद राहणार?
- 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
- स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
- सर्व पर्यटन स्थळं बंद
- प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
- हॉटेल रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे.
- सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध
डोमॅस्टिक फ्लाईट्ससोबतच ट्रेन, रोड-वे ने राज्यात प्रवास करत यायचे असल्यास संपूर्ण लसीकरण किंवा आरटीपीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट 75 तासांपूर्वीचा बंधनकारक आहे. ड्रायव्हर, क्लीनर आणि स्टाफला देखील नियम लागू आहेत. धार्मिक स्थळांबाबत मात्र नियमावलीत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.
राज्यात 41 हजार 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement