तुमच्या औलादी म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना मनसेचा पहिला पलटवार, अॅट्रॉसिटीचं संरक्षण नसतं तर...
गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आद मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Prakash Mahajan on Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आद मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण आहे म्हणून दुसऱ्यांबद्दल काहीही बोलणे योग्य नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली आहे असं म्हणत महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली.
भय्यूजी जोशी यांच्याबाबत राज ठाकरे यांनी त्यांचे मत मांडले आहे. मात्र सदावर्ते यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल केलेला शब्दप्रयोग बरोबर नाही असे महाजन म्हणाले. तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकतात? हा शब्दप्रयोग योग्य नाही असे महाजन म्हणाले. सदावर्ते तुम्हाला जर ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण नसलं असतं तर याचं मी तुम्हाला चांगल उत्तर दिलं असतं असे महाजन म्हणाले. ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण आहे म्हणून दुसऱ्यांबद्दल काहीही बोलणे योग्य नाही. गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली आहे असे महाजन म्हणाले.
गुणरत्न सदावर्तेंची सनद रद्द करावी
बीडमधील झालेल्या हत्याकांडातील प्रमुख आरोपीला गुणरत्न सदावर्तेंनी साहेब म्हणून संबोधले होते. माझी बार कौन्सिलला विनंती आहे की, याची सनद देखील रद्द करावी असे महाजन म्हणाले. यावरुन त्याची मानसिक पातळी दिसून येते. बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीबाबत केलेल्या वक्तव्यावर सदावर्ते यांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले पाहिजे. अनिल परब यांनी पक्षावर बोलणे योग्य नाही असे महाजन म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मोठे आहे असे म्हणत त्यांनी परब यांचा देखील समाचार घेतला आहे.
काय म्हणाले होते गुणरत्न सदावर्ते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. तसेच त्यांनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याचं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी समर्थन केलं आहे. सदावर्ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला होता. राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, मला खरोखर राज ठाकरेंची कीव येते. राज ठाकरे मला हे सांगा, तुमचे जी मुलं आहेत, तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? स्वत:चे लेकरं कॉन्वेंट, स्वत:ची लेकरं आयबीडीपीमध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका", असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी केला. "संविधानानुसार भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह असं काहीही नाही", असं देखील सदावर्ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
Dhananjay Munde: धनंजय मुंडे लोकांमधून निवडून आलेत, तुमची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी... गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल























