Nashik News : पुण्यात होर्डिंग्स कोसळलं, नाशिकमध्ये दोन हजारांहून अधिक होर्डिंग्स उतरविले; महापालिकेची कारवाई
Nashik News : नाशिक (Nashik) महापालिकेकडून होर्डिंग्स हटाव मोहीम राबविण्यात येत असून दोन हजाराहून अधिक फलक हटविले आहेत.
Nashik News : नाशिक शहरात (Nashik) दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनांबरोबर जागेअभावी रस्त्यारस्त्यांवर वाहतूक कोडींचा (Traffic Jam) सामना नागरिकांना करावा लागत आहे. दुसरीकडे शहरातील विविध भागात रस्त्यांवर होर्डिंग्स (Hoardings) लागत असल्याने त्यामुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून होर्डिंग्स हटाव मोहीम राबविण्यात येत असून मागील दीड महिन्यात दोन हजाराहून अधिक फलक हटविले आहेत.
नाशिक (Nashik City) शहर जसजस वाढत आहे, तसतसं शहरात प्रसिद्धीसाठी अनेक भागात, चौकाचौकात बँनरबाजी (Banner) होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील मेनरोड, गंगापूर रोड, नाशिकरोड, सिडको, अंबड, इंदिरानगर, मुंबईनाका, पेठ रोड आदी भागात होर्डिंग्स दिसून येतात. मोठमोठे होर्डिंग्स असल्याने अनेक वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच अनेकदा अपघाताच्या घटनाही घडत असतात. नुकतीच पुण्यात होर्डिंग्स कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे नाशिक महापालिकेने होर्डिंग्सबाबत महत्वाचे पाउल उचलून शहरातील 2 हजार 352 अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत.
नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) हद्दीत वाहतुकीस अडथळा ठरणारे चौकाचौकात लावण्यात आलेले अनधिकृत फलक हटविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण विभाग सातत्याने मोहिम राबवित आहेत. त्यानुसार मागील दीड महिन्यात सहा विभागात तब्बल 2 हजार 352 अनाधिकृत फलक हटविले. जाहिरात बोर्ड, होल्डिंग, पोल बॅनर, झेंडे, पोस्टर्स, स्टॅण्ड बोर्ड असे काढलेल्या फलकांचा समावेश आहे.
मार्च महिन्यात 1 हजार 831 फलक हटविले....
संपूर्ण मार्च महिन्यात 1 हजार 831 फलक हटविण्यात आले. यात सातपूर विभागात 845 तर नाशिक पश्चिममध्ये सर्वात कमी म्हणजे 47 फलक हटविण्यात आले आहेत. 1 ते 16 एप्रिल या पंधरवड्यात 521 अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक पूर्व मध्ये सर्वाधिक 120 फलक तर नाशिक पश्चिम विभागात कमी 36 फलक हटविण्यात आले आहेत. दरम्यान शहरात अद्यापही ज्या नागरिकांनी अनधिकृत फलक, होल्डिंग असेल त्यांनते काढल्यास ते काढून टाकावे. अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल. असा इशार अतिक्रमण विभगाच्या उपायुक्त अतिक्रमण करुणा डहाळे यांनी दिला आहे.
अतिक्रमणाची समस्या जैसे थे?
एकीकडे महापालिकेकडून अनाधिकृतपणे शहरातील फलक काढण्याची मोहीम हाती घेतली असताना, दुसरीकडे शहरातील रस्त्यांचा श्वास कोंडणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाइ कधी होइल असा सवाल केला जात आहे. मेनरोड, शालीमार परिसर, नाशिकरोड परिसरातील मुक्तीधाम परिसर आदीसह विविध भागात अनेकांनी अनाधिकृतपणे अतिक्रमण थाटले आहे. याकडे लक्ष द्यायला अतिक्रमण विभागाला वेळ कधी मिळेल असा प्रश्न नागरिक करत आहे.