एक्स्प्लोर

Nashik Crime : सहा महिन्यापूर्वीचा अपघात, मात्र पोलिसांना संशय, माजी सैनिकाच्या खुनाचा उलगडा 

Nashik Crime : सहा महिन्यापूर्वी इगतपुरीतील भावली धरण परिसरात ही कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. 

Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांनी उलगडा केला. या घटनेत माजी सैनिकाचा खून (Murder) झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत. सहा महिन्यापूर्वी भावली धरण परिसरात (Bhawali Dam) ही कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. 

घोटी पोलीस स्टेशनच्या (Ghoti Police Station) हद्दीत आंबेवाडी गावच्या शिवारात एक जळालेली कार आढळून आली होती. यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह देखील आढळून आला होता. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए सॅम्पल घेण्यात आलेले होते. तसेच जाब-जबाबावरून सदर प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मयत संदीप पुंजाराम गुंजाळ (Sandeep Gunjal) हे माजी सैनिक होते. ते समृध्दी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी येथे सिक्युरिटीचे काम असल्याची माहिती मिळाली होती. ऑगस्ट 30 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते साउथ पोल समृध्दी महामार्ग येथून त्यांची सॅन्ट्रो कार घेवून गेले होते. सकाळी साडे आठ वाजता जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आंबेवाडी शिवारात मिळुन आला होता. 

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Police) पथकाने यातील मयत संदीप गुंजाळ हे सिक्युरीटी म्हणून काम करत असलेल्या समृध्दी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी या ठिकाणी भेट दिली. समृध्दी महामार्गाचे कामगार, सिक्युरिटी गार्डस् व ऑफीस स्टाफ यांना चेक करून मयत संदीप गुंजाळ यांच्याबाबत विचारपूस करण्यात आली. संदीप हे त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्याकडील कार घेवून भावली धरण परिसराकडे गेले असल्याचे समजले होते. यानुसार पोलीस पथकाने भावली धरण परिसरात माहीती घेतली असता घटनेच्या दिवशी मयत हा गाडी चालवीत असतांना नांदगाव सदो येथील एका दुचाकीवरील इसमांशी कट मारल्याचे कारणावरून भांडण झाले असल्याचे समोर आले. त्यावरून नांदगाव सदो शिवारातून संशयित आकाश चंद्रकांत भोईर, एक विधीसंर्धीत यांना ताब्यात घेतले. 

काय घडली होती घटना...?

सुमारे 06 महीन्यांपूर्वी समृध्दी महामार्गाचे पूलाखाली सर्कलजवळून नांदगाव सदो गावाकडे स्प्लेंडर गाडीने जात असतांना समोरून एका सॅन्ट्रो कारने कट मारला. म्हणून त्यास संशयितांनी शिवीगाळ केली. त्यामुळे त्याने गाडी थांबवून खाली उतरून शिवीगाळ केल्यांनतर आमच्यात भांडण झाले, त्यातून त्यास चॉपरने पोटावर वार करून जखमी करून जीवे ठार मारले. त्यास गाडीत टाकून भावली धरणाचे दिशेने घाटात जावून निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबविली. त्यावेळेस त्यास ड्रायव्हर सीटवर बसवून गाडीत असलेल्या डिझेल कॅन त्याच्या अंगावर व गाडीवर ओतून देवून त्यास पेटवून दिल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
धक्कादायक! हिंगोलीत शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांनी मारहाण करत धमकावलं, नातेवाईकांचे गंभीर आरोप 
धक्कादायक! हिंगोलीत शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांनी मारहाण करत धमकावलं, नातेवाईकांचे गंभीर आरोप 

व्हिडीओ

Anjali Damania Pc : चाकणकरांचे खरातला 177 फोनकॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, दमानियांचा गौप्यस्फोट
Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरी पळाली, घरातील मौल्यवान वस्तूही गायब; पोलिसांकडून लुटेऱ्या टोळीचा पर्दाफाश
CBSE 10th Result 2026 Declared: सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार

Embed widget