Nashik Citylink Bus : दोन महिन्यांचा पगार रखडला, साप्ताहिक सुट्टीही नाही, नाशिक सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
Nashik Citylink Bus : वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा आज सलग तिसऱ्या दिवशी बंद आहे.
Nashik Citylink Bus : गेल्या महिन्यातील संप मिटत तोच पुन्हा एकदा नाशिकच्या (Nashik) सिटीलिंक बस कर्मचाऱ्यानी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. वाहकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले असून अनेकांना साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून सिटीलिंक बस (citylink Bus Service) कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे नाशिककरांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत.
नाशिक मनपाने (Nashik NMC) जुलै 2021 मध्ये शहरात सिटीलिंक बस सेवा सुरू केली. त्यानंतर या बस सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसादही लाभला. मात्र सिटीलींकची बस सेवा सुरू होऊन दोन वर्ष होत नाही, तोच पगार रखडल्याने सिटीलींक कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यात तिसऱ्यांदा संप केला असून संपाचा हा तिसरा दिवस आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार वर्गासह इतर प्रवाशांचे हाल झाले यात रिक्षा चालकांचे फावले असून वारेमाप लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. 3000 हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या असून सिटी लिंक व्यवस्थापनाला देखील लाखो रुपयांचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तात्काळ वेतन जमा व्हावे आणि इतरही मागणी मान्य केल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने सिटीलिंक प्रशासन कोंडीत सापडले आहे.
दरम्यान, वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा आज सलग तिसऱ्या दिवशी बंद आहे. तपोवन डेपोतून एकही बस बाहेर पडली नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. वाहकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले आहेत. तसेच अनेकांना साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. विशेष म्हणजे नियम मोडल्यास दंडही आकारला जात असल्याचा आरोप वाहकांचा असून ठेकेदाराने आश्वासन पूर्ण न केल्याने वाहक आक्रमक झाले आहेत. सिटीलिंक कार्यालयात दोन दिवसांपासून वाहकांसोबत प्रशासनाची बैठक होतेय. मात्र कुठलाही तोडगा निघत नसल्याने हा संप मिटणार तरी कधी असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे. बसचे चालक रोज हजेरी लावत आहेत, मात्र वाहकच नसल्याने बससेवा विस्कळीत आहे.
दोन आठवड्यांपूर्वी सिटीलिंकच्या कर्मचारी कर्मचाऱ्यांनी रखडलेले वेतन मिळावे यासाठी संप पुकारला होता. या संपानंतर पालिकेत 18 जुलैला झालेल्या बैठकीत 21 तारखेपर्यंत वेतन अदा करण्याची तंबीच ठेकेदाराला दिली होती. मात्र अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने पुन्हा एकदा शुक्रवारी अचानक संप पुकारत एकही बस डेपो बाहेर येऊ दिली नाही, त्यामुळे विद्यार्थी, कामगार, प्रवाशांचे हाल झालेच, शिवाय खिशाला भुर्दंड देखील बसला आहे. आज संपाचा तिसरा दिवस असून मोठा फटका नाशिककरांसह सिटी लिंक व्यवस्थापनाला बसला आहे.
वर्षभरात पाचव्यांदा संप
नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे, आज संपाचा तिसरा दिवस असून ठेकेदाराने आश्वासन पूर्ण न केल्याने वाहक संपावर गेले आहेत. त्यामुळे आजही एकही बस रस्त्यावर धावली नाही. सिटीलिंक बस बंद असल्याने प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. रिक्षाला त्यामुळे प्रतिसाद लाभत असल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी जादा पैसे आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. सर्व वाहक डेपोत तपोवन येथे जमा झाले असून हा वर्षभरात पाचव्यांदा संप करण्यात आलं असून अधिकारी वर्ग तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :