एक्स्प्लोर

Nashik Crime : ऑनलाईन गेम खेळत असाल तर सावधान! तुमचं बँक खात रिकामं होऊ शकत... नाशिकमध्ये काय घडलं? 

Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथील तरुणाला ऑनलाईन गेमिंग चांगलेच महागात पडले आहे. 

Nashik Crime : सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile) आल्याने इंटरनेटसह अनेक सुविधा यात मिळत आहेत. मात्र अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंगच्या (Online Game) आहारी जात असल्याचे चित्र सभोवताली पाहायला मिळत आहे. यातून अनेकदा फसवणूक (Fraud) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथील तरुणाला ऑनलाईन गेमिंग चांगलेच महागात पडले आहे. 

दोनच दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमच्या (Online Game) नादात एका युवकाची तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जालना (Jalna) तालुक्यातील ढगे गावात उघडकीस आली होती. या तरुणाला ऑनलाईन गेमिंग खेळण्यासाठी एक एकर शेतीसह 17 लाख रुपयांची कारही विकावी लागली. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. सदर तरुणाची ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळल्यास झटपट दुप्पट पैसा देण्याचे आमिष दाखवून छत्तीस लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी  पाच जणांविरोधात लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सुनील शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित आचल चौरसिया, रमेश चौरसिया, कैलास शहा, गणेश एकनाथ दिडे , अमोल कपिल यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2022 ते दिनांक 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत वेळोवेळी निफाड तालुक्यातील धारणगाव व अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील संशयित गणेश दिडे याचे लॉटरीचे दुकानात वेळोवेळी ऑनलाइन बिंगो गेम खेळले. संशयितांनी सदर तरुणास सायबर गेम खेळल्यास झटपट दुप्पट पैसा मिळतात, असे विश्वासाने सांगून अधिक आर्थिक लाभाचे आमिष दाखवून शुभम यास ऑनलाइन बिंगो सायबर गेम मोबाइलमध्ये खेळण्यास भाग पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

तेव्हा फसवणूक झाल्याचं कळलं.. 

दरम्यान संशयितांनी फिर्यादीस विश्वासात घेत पैशांचे आमिष दाखवून शुभमने वेळोवेळी गणेशला पैसे दिले. तसेच अमोल कपिले यांच्या सांगण्यावरून राहुल माणिक गोतरणे व संतोष मोहन चव्हाण यांच्या फोन पेवर ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळण्यासाठी वेळोवेळी पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर केले. या कालावधीत फिर्यादी शुभम याने जवळपास 36 लाख 80 हजार रुपये संशयिताच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पाठविले. मात्र या खेळात शुभम हरतच गेला. ऑनलाइन बिंगो सायबर गेममध्ये हरल्याने शुभमची आर्थिक फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळण्यास भाग पाडणारे आणि चालविणाऱ्या संशयितांनी शुभम यास ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळण्यास प्रवृत्त करून अधिक पेशाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली म्हणून लासलगाव पोलिसांत गुन्हा झाला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुरडनर करीत आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात संपाचं विघ्न... बार्शीचं वऱ्हाड अकोल्यात ताटकळलं, उपनिबंधक कार्यालयात वधु-वरास मनस्ताप; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?
लग्नात संपाचं विघ्न... बार्शीचं वऱ्हाड अकोल्यात ताटकळलं, उपनिबंधक कार्यालयात वधु-वरास मनस्ताप; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Ashok Kharat Crime News: ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
Shivendra Raje Bhosale on Eknath Shinde: सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत; पण शिवसेना, राष्ट्रवादीकडून जाणूनबुजून...; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' इशाऱ्याला शिवेंद्रराजेंचं प्रत्युत्तर
सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत; पण शिवसेना, राष्ट्रवादीकडून जाणूनबुजून...; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' इशाऱ्याला शिवेंद्रराजेंचं प्रत्युत्तर

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Nanded Crime News: मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
Embed widget