एक्स्प्लोर

Maharashtra Mumbai Rains LIVE : राज्यात पावसाचा जोर कमी, पुराचं पाणी ओसरु लागल्यानं नागरिकांना दिलासा

राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Mumbai Rains LIVE : राज्यात पावसाचा जोर कमी, पुराचं पाणी ओसरु लागल्यानं नागरिकांना दिलासा

Background

Maharashtra Rain Updates LIVE : आठवडाभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही नुकसान झालं आहे. दरम्यान, कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
  
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीलगत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातल्यानं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंभीर स्थिती झालीी आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत आहे. 

वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

आठवडाभरापासून वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे मार्ग ठप्प झाले आहेत. कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.  

कोल्हापुरात पुराचा धोका टळला

गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. त्यामुळं सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा  विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा जोर ओसरू लागला असला, तरी अजूनही जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास पाणी वेगाने कमी होण्याची शक्यता आहे.  

गडचिरोलीतल सिरोंचामध्ये भितीदायक स्थिती
 
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी भयावह स्थिती झाली आहे. जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावर असलेल्या सिरोंचा इथं भयावह स्थिती झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून या शहराला चारही बाजूनं पाण्यानं वेढा दिला आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
 
15:17 PM (IST)  •  17 Jul 2022

Aurangabad: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबादमध्ये पाऊसाची पुन्हा जोरदार बॅटिंग

Aurangabad Rain: गेल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गेली दोन दिवस विश्रांती घेतली होती. त्यांनतर मात्र आज पुन्हा पाऊसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. गंगापूरमध्ये दुपारी तीन वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. गंगापूर शहरातील चौकात अचानक आलेल्या पावसामुळे काही वेळेसाठी लोकांची धावपळ उडाल्याची पाहायला मिळाली.

15:06 PM (IST)  •  17 Jul 2022

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी, थोड्याच वेळात विरोधकांची बैठक

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात विरोधकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आहे. 

13:20 PM (IST)  •  17 Jul 2022

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात, आलापल्ली भामरागड मार्ग वाहतुकीसाठी बंद

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. भामरागड शहरालगत असलेल्या पर्लकोटा नदीला परत एकदा पूर आला आहे. पुराचं पाणी भामरागड शहरात शिरलं आहे. भामरागडमध्ये सकाळपासून मुसळार पाऊस सुरु झाला आहे. अचानक पुराच्या पण्याची पातळी वाढल्यामुळे लोकांची पळापळ सुरु झाला आहे. आलापल्ली भामरागड मार्ग परत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 120 गावांचा संपर्क परत मुख्यालयाशी तुटला आहे. दोन दिवसाआधी हा मार्ग सुरु झाला होता. आता परत तो बंद झाला आहे. 

11:22 AM (IST)  •  17 Jul 2022

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरु असणारा विसर्ग केला कमी

Pune Rain : खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरु असणारा 4 हजार 708 क्युसेक विसर्ग कमी करुन 2 हजार 996 क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. 

10:15 AM (IST)  •  17 Jul 2022

परभणीचा मासोळी प्रकल्प ओव्हरफ्लो, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी 

Parbhani Rain : परभणीचा मासोळी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी गंगाखेडकरांनी मोठी गर्दी केली आहे. गंगाखेड शहरासह अनेक गावांचा पाणी आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. परभणी जिल्ह्यात मागच्या आठवड्यात पडलेल्या पावसाने अनेक प्रकल्पातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर काही प्रकल्प भरलेही आहेत. गंगाखेड तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला मासोळी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. सर्व बाजुंनी डोंगररांगा आणि मधोमध हा मासोळी प्रकल्प आहे. त्यातच हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी गंगाखेड सह परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. यंदा जुलैमध्येच हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने गंगाखेड शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न ही मिटला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget