Mumbai News : मुंबईत बसमध्ये मोबाईल वापरण्यास मनाई; नियमांचा भंग केल्यास होणार कारवाई; बेस्टकडून आदेश जारी
Mumbai News : बेस्ट बसमध्ये प्रवास करताना मोबाईल फोनवर (Mobile Phone) मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.
Mumbai News : मुंबईत बेस्ट (BEST) बसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बसमध्ये प्रवास करताना मोबाईल फोनवर (Mobile Phone) मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. आपल्या शेजराच्या सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची बेस्ट प्रशासनाने दिली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
स्मार्टफोन वापरण्यास सक्त मनाई
अनेकजण सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठमोठ्याने बोलतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात. यामुळं बेस्टने अशा प्रवाशांना सक्त ताकीद देत बेस्टमध्ये स्मार्टफोन वापरण्यास मनाई केली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल असतात. त्याचा ते वापर मुक्तपणे करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाईलवर बोलत असतात. तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकत बघत असतात. आवाजाची पातळी जास्त असल्यामुळं बसगाडीमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो, असं यामध्ये म्हटलं आहे.
इयरफोन शिवाय ऑडिओ आणि व्हिडीओ ऐकण्यास मनाई
बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा आहे. या बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होवू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. याकरता मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम 38 / 112) सदर प्रवाशांवर कारवाई होवू शकते. यामुळं बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ आणि व्हीडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.
बेस्ट बसमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिसूचनेची माहिती
बेस्ट बसमध्ये काम करणाऱ्या सर्व खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाही या अधिसूचनेची माहिती देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेस्टकडे 3400 बसेसचा ताफा आहे. बेस्ट मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरला बससेवा पुरवते. प्रवासी वारंवार त्यांच्या सहप्रवाशांचा फोन जोरात वाजत असल्याच्या तक्रारी करत होते. त्यावर बेस्टने हा निर्णय घेतला असून यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: