नवी मुंबईतल्या सहा डान्स बारच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश, डान्स बारच्या आड वेश्याव्यसाय
डान्स बार आणि येथील वेश्याव्यवसाय कसा सुरु आहे? हे आमचे प्रतिनिधी यांनी गेल्या दोन आठवड्यापासून या सगळ्या घडामोडींचा पाठपुरावा केला आहे.
नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाण्यातून डान्सबारचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं. प्रशासनानं कारवाई केली. अजूनही ते सगळे डान्सबार बंद आहेत. पण, ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावरच नवी मुंबईमध्ये डान्सबारचं नवं पेव फुटलंय. फक्त डान्स बार नाही, तर त्याच्या आड वेश्याव्यवसायही सुरु आहे. एक, दोन नाही...तर तब्बल सहा ठिकाणी एबीपी माझाचा कॅमेरा पोहोचला. आणि तिथला काळेधंदे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
ओमयक्रॉनचे संकट घोंगावत आहे ज्याला आळा घालण्यासाठी राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात कलम 144 (जमावबंदी) लावण्यात आली आहे. पण नवी मुंबईमध्ये सर्रास डान्स बार सुरू असून तिथे त्याच डान्सबारमध्ये वेश्या व्यवसाय सुद्धा सुरू आहे. नवी मुंबईच्या वाशी रोड येथील भारती डान्सबार , राजमहाल येथे देखील वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. येथे मुलींच्या दिसण्यावरून त्यांचे दर ठरवले जातात. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांचे दर कमी- जास्त होत असतात. साधारण एका मुलीचा तीन हजार रुपये मुलीचा दर असल्याची माहिती या वेळी समोर आली आहे. नवी मुंबईत देखील अशीच नियमांची पायमल्ली सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
राज्यामध्ये कडक निर्बंध असताना दुसरीकडे नवी मुंबईमध्ये वेगळेच विश्व असल्याचा पाहायला मिळाले त्यामुळे हे सगळं नेमकं कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि कोणाचा यांच्यावर वरदहस्त आहे? त्यांचा शोध घेऊन प्रशासन यांच्यावर कारवाई करणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- राज्यपालांच्या मंजुरीशिवाय होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र
- आवाजी मतदानानं निवडणूक घटनाबाह्य, राज्यपालांची भूमिका; विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी होणार?