एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra Monsoon : हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.

LIVE

Key Events
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा

Background

Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, पालघर, पुणे, परभणी, चंद्रपूर, वाशिम, नागपूर, अहमदनग या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मात्र, अदयापही काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
 
परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा 

परभणी शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. परभणी शहरासह,सेलू, लिमला, लोहगाव,आदी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. या पावसानं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं वातावरण आल्हाददायक झाले आहे. मात्र, सर्वत्र दमदार पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या असून, अजूनही पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही पावसाची हजेरी

अहमदनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. कोपरगाव शहरात दुपारी मान्सुनच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर तसेच सखल भागात पावसाचे पाणी साचल्यानं वाहनधारकांना वाहन चालवण्यास त्रास होत आहे. या पावसामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.  

चंद्रपूरमध्ये पहिला मुसळधार पाऊस

मोठ्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुर जिल्ह्यात पहिला मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. पावसाच्या आगमनानं उष्ण हवामानापासून नागरिकांना मिळाला दिलासा मिळाला आहे. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळं शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान, समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या  खोळंबल्या आहेत. बळीराजाला पेरणीसाठी सलग काही दिवस दमदार पावसाची गरज आहे.

वाशिममध्ये पावसाची हजेरी

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. तर बरसलेल्या पावसानं शेतीच्या कामांना अधिक वेग मिळणार असून, खोळंबलेल्या खरीप पेरण्याला वेग मिळणार आहे.

16:59 PM (IST)  •  21 Jun 2022

Mumbai Rain Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात

Mumbai : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. 

14:49 PM (IST)  •  21 Jun 2022

Aurangabad Rain Update: औरंगाबादमधील काही भागात पावसाची हजेरी

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात आज पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील गंगापूर आणि कन्नड तालुक्यातील चापानेर येथे पावसाने हजेरी लावली. मात्र अजूनही अनेक भागात बळीराजाचे लक्ष पावसाकडे लागले आहेत. 

09:19 AM (IST)  •  21 Jun 2022

पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी, जव्हार शहरात धुक्याची चादर

पालघर जिल्ह्यात पावसानं सलग दोन दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर आज जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हार शहरात मनमोहक धुक्याची चादर पाहायला मिळाली. पहाटेपासूनच संपूर्ण जव्हार शहराला आल्हाददायक धुक्यानं वेढा घातल्याचे चित्र आहे.

08:58 AM (IST)  •  21 Jun 2022

तळकोकणात संततधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Thackery Vs Shinde Shivsena: खरी शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत कोणाला किती जागा?
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपकडून अपक्षांना जाळ्यात ओढण्यासाठी ६ नेत्यांवर साखरपेरणीची जबाबदारी
अपक्ष, बंडखोरांना जाळ्यात ओढण्यासाठी भाजपकडून ६ नेत्यांवर साखरपेरणीची जबाबदारी
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Embed widget