एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon : उद्यापासून परतीचा मान्सून माघारी फिरणार, 15 ऑक्टोबरपासून राज्यात उघडीपीची शक्यता

उद्यापर्यंत राज्यात परतीचा पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे 15 ऑक्टोबरपासून राज्यात उघडीपीची शक्यता असल्याचे  मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केलं आहे.

Maharashtra Monsoon : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी शेती पिकांच नुकसान झालं आहे. मात्र, हा परतीचा पाऊस उद्यापर्यंत (14 ऑक्टोबर) असण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे 15 ऑक्टोबरपासून राज्यात उघडीपीची शक्यता असल्याचे  मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केलं आहे. वातावरण जरी ढगाळ असेल तर राज्यात उघडीप जाणवेल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

उद्यापासून मान्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार

हवामान विभागानं (Department of Meteorology) दिलेल्या माहितीनुसार गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे मागील दोन ते तीन दिवस पाऊस झाला आहे. आता शनिवारपासून (15 ऑक्टोबरपासून) राज्यात ढगाळ वातावरण जरी असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपच जाणवेल. अगदीच कुठे तरी तुरळक पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 14 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून परतीच्या मान्सूनच्या माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता आहे.  

20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान किरोकोळ पावसाची शक्यता

दिवाळ सणादरम्यान साधारण 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे. मात्र, उद्यापासून राज्यात न्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. त्यामुळं राज्यात पावसाची उघडीप होणार आहे. 

आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट

परतीच्या पावसानं  राज्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. आजही हवामान विभागानं  राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 

या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागांना देखील या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

 महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात 'यलो अलर्ट' 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Sharad Pawar:  मोठी बातमी: विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Embed widget