हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून
Thackeray Family Daughter-in-law : माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार आहे
Thackeray Family Daughter-in-law : माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार आहे. निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी येत्या 28 डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि लग्नाचे निमंत्रण दिले. येत्या 28 डिसेंबरला मुंबईमध्ये निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांचा विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.. निहार यांच्या वडील बिंदुमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत, तर राज ठाकरे हे त्यांचे सख्खे चुलत काका आहेत. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. अंकिता पाटील या काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या असल्या तरी गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपशी जवळीक साधली आहे.. ठाकरे-पाटील विवाहामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलंय. विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी थाटामाटाने भोजनसोहळा 17 डिसेंबर रोजी होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात राजकीय कुटुंबात सध्या विवाहाची धामधूम पार पडत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गुलाबराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या घरात लग्नकार्ये पार पडली. आता यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या घरीही विवाहाची धामधूम सुरु झाली आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
तालुक्यात विकास कामे केल्यामुळे मला शांत झोप लागते! राज्यमंत्री भरणे यांचा नाव न घेता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला
Special Report : भाजपमध्ये मी मस्त, निवांत,चौकशीची चिंता नाही; हर्षवर्धन पाटील यांचं सूचक वक्तव्य
भाजपमध्ये आपण निवांत, कारण आपली चौकशी सुरु नाही; हर्षवर्धन पाटलांचे मिश्किल वक्तव्य