एक्स्प्लोर

Maharashtra Mini Lockdown : 'आम्ही सर्व नियम पाळू, मात्र व्यापार करण्यास परवानगी द्या', व्यापाऱ्यांची मागणी

दुकाने बंद असल्यानं व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ज्यात लाईट बील, कर्मचाऱ्यांचे पगार इतर देयके देताना अडचणी येतील असं ट्रेड असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीची पदाधिकारी म्हणाले. 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर मोठे निर्बंध आल्याने राज्य सरकारला त्यांच्या असंतोषाला सामोरे जावं लागते आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षा -टॅक्सी-बस प्रवासाला सरकारने मुभा दिली आहे. मात्र, ही मुभा देताना पंक्चर काढणारी गॅरेज आणि गाड्यांचे सुटे पार्ट विकणारी दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे "आम्ही सर्व नियम पाळू मात्र व्यापार करण्यास परवानगी मिळावी", अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. 

या संदर्भात राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या वेळी राज्य सरकारने दोन दिवसांचा अवधी मागून घेतला असल्याचं स्कूटर्स पार्ट डिलर असोसिएशनचे देवेश दानी म्हणाले. आम्ही सर्व नियम पाळू मात्र व्यापार करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी ग्रॅंड रोडवर दुकाने असणाऱ्या संघटनेच्या 
पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

तिकडे आयटी  क्षेत्रात  काम करणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुरु आहे. मात्र, लॅपटॉप, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने मात्र सध्या बंद आहेत. त्यामुळे जर आपला लॅपटॉप आणि राउटर वगैरे बंद पडलं कुठे जायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तो सहाजिक आहे. मात्र, राज्य सरकारने या दुकानांवर कडक निर्बंध आणत त्यांचे व्यवहार सकाळी देखील बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जर तुमचा लॅपटाॅप किंवा राउटर काम करताना बंद पडला तर तुमची देखील अडचण होणार आहे.

 मुंबईतील लॅमिंग्टन रोडवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर पार्ट्स आणि लॅपटॉपचं मोठं प्रस्त आहे. मात्र, कडक निर्बंधांमुळे येथील 1200 दुकानांमधील व्यवहार बंद आहे. हे मार्केट मुंबईतील सर्वात मोठं मार्केट म्हणून गणलं जातं. ज्यात कम्प्युटर्सचे पार्ट, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट, टीव्ही उपकरणे आणि मेडिकलला लागणाऱ्या उपकरणांचाही समावेश आहे. दुकाने बंद असल्यानं व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ज्यात लाईट बील, कर्मचाऱ्यांचे पगार इतर देयके देतांना अडचणी येतील असं ट्रेड असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीची पदाधिकारी म्हणाले. 

संबंधित बातम्या :

Maharashtra Mini Lockdown :'निर्बंध मागे घ्या, अन्यथा बाजारपेठ उघडू', मिनी लॉकडाऊनविरोधात राज्यभरात व्यापारी आक्रमक

सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Maharashtra Corona Crisis: उद्याऐवजी सोमवारपासून दुकान सुरु करणार, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसला चीन, सियाचीन ग्लेशियरजवळ बेकायदेशीर रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Guest Center : सांगलीत विश्वजीत कदम ठाकरेंवर कडाडले, Chandrahar Patil यांना काय वाटतं?Zero Hour : पक्ष नेत्यांसमोर Vishwajeet Kadam यांची उघड नाराजी, विश्वजीत कदमांचा ठाकरेंना इशाराABP Majha Headlines : 9 PM : 25 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray Full PC : आरोग्य, अर्थ, कृषी क्षेत्रासाठी मोठी आश्वासनं, ठाकरेंच्या वचननाम्यात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
उदयनराजेंचं शरद पवारांना 'हे' चॅलेंज; साडे तीन जिल्ह्याचा पक्ष अन् मानसपुत्र म्हणत डिवचलं
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसला चीन, सियाचीन ग्लेशियरजवळ बेकायदेशीर रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भारताची चिंता वाढली! पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ते बांधकाम, सॅटेलाइट फोटो समोर
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
भज्जीच्या संघात हार्दिक पांड्याला नो एन्ट्री, विश्वचषकासाठी निवडले 15 शिलेदार
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
बीड लोकसभेत नवा ट्विस्ट, जरांगेंचा खास माणूस निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी भरला अर्ज
बीड लोकसभेत नवा ट्विस्ट, जरांगेंचा खास माणूस निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी भरला अर्ज
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
मोठी बातमी! सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी पंजाबमधून उचललं
Embed widget