नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.
अहमदनगर : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातचं आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. अनलॉक 5 अंतर्गत राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.
कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे अहमदनगरमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात रेल्वे देखील सुरु करण्यात आली आहे. लवकरचं सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालय सुरु करण्याचा विचार आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
काय आहे अनलॉक 5 मध्ये?
- अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
- राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
- ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
- डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
- मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या
- पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार
काय बंद राहणार?
- शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क
अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
UNLOCK | नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत