एक्स्प्लोर

Maharashtra Government : 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, मुख्यमंत्र्यांची घोषणा, जनतेला दिलासा!

Maharashtra Government : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासात 50% सवलत होती, मात्र आता हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे.

Maharashtra Government : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST Buses) मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल केली. राज्य सरकारने काल तीन महत्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारी कर्मचारी, 75 वर्ष पूर्ण केले ज्येष्ठ नागरिक, गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर आज शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. 

75 वर्षावरील नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खुप मोठी घोषणा केली. यापुढे 75 वर्षावरील नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50% सवलत होती, परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष किंवा त्यावरील असतील त्यांना आता एस टी बसचा मोफत प्रवास असेल.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकत्रित सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील या नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल.

दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखाचे विमा संरक्षण

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केले की, गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे.

वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GeM) पोर्टलद्धारे

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.

आजपासून अधिवेशन, पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने

राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर तीन विरोधी पक्षाचं आव्हान असणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप
Ratnagiri : रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
रत्नागिरीत शिक्षकी पेशाला काळीमा! शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला शिक्षकाला चोप
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Embed widget