एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही

Background

Maharashtra Government : महाराष्ट्रात ठाकरे सरकारनं आज आपली दोन वर्ष पूर्ण केली आहेत. अनेक खलबतं, राजकीय नाट्यानंतर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ठाकरे सरकारनं (Thackeray Government) राज्याची धुरा सांभाळली होती. 2019 मध्ये पार पडलेल्या निवडणूक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2019 निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली. पण निवडणूक निकालांनंतर नाराजीनाट्य सुरु झालं. निवडणुकीच्या निकालांनंतर भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि सत्तेची सर्व गणितं बदलली. तिन पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) राज्यात उदय झाला आणि निवडणूकीत सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला विरोधी पक्षाची भूमिका स्विकारावी लागली. आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेची धुरा सांभाळली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, पूरस्थिती यांसारखी अनेक संकटं राज्यावर चाल करुन आली आणि त्यावेळी ठाकरे सरकारची कसोटी पणाला लागली. विरोधकांचे टीकेचे बाण झेलत तीन पक्षांचं सरकार असलेल्या ठाकरे सरकारनं वेळोवेळी सत्वपरिक्षा पार केली. अनेकदा टीकेची झोडही उठली पण त्यातूनही मार्ग काढत आजपर्यंतचा प्रवास ठाकरे सरकारनं पार पाडला आहे. 

मी उद्धव बाळासाहेब ठाकरे... उद्धव ठाकरेंनी घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ

आजच्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालं होतं. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिलं होतं. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतली होती. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली.

ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या भागांत उत्सव साजरा करणार आहेत. अशातच विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेलं भाजप राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल करणार आहे. दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सरकार आपल्या कामांचा पाढा वाचणार आहे, तर विरोधी पक्ष सरकार कसं अपयशी ठरलं हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे. सरकारनं दोन वर्षांत केलेली काम जनतेसमोर मांडण्यासाठी महाविकास आघाडीत समाविष्ठ असलेल्या तिनही पक्षांचे कार्यकर्त्यांकडून लहान-मोठ्या संभांचंही आयोजन करण्यात आलं आहे. 

288 सदस्य असलेल्या विधानसभा निवडणुकांमधून शिवसेनेचे 56 आमदार, राष्ट्रवादीचे 54 आमदार तर काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले होते. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं सर्वाधिक 105 जागांवर विजय मिळवला होता. पण 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 26.1 टक्के मत मिळाली होती. तर शिवसेनेच्या खात्यात 16.6 टक्के मतं मिळाली होती. या निवडणुकीत एनसीपीच्या खात्यात 16.9 टक्के मत मिळाली होती. तर काँग्रेसला 16.1 टक्के मतं मिळाली होती. या निवडणुकीत इतर दलांना 14.3 टक्के मतं मिळाली होती. 

दरम्यान, महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार बनलं, त्यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी मत मांडलं होतं की, हे आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही. तसेच या तिनही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी फारसं जुळणार नाही, असंही मत त्यावेळी व्यक्त केलं जात होतं. पण सत्तेची दोन वर्ष यशस्वीपणे पूर्ण करत ठाकरे सरकारनं अनेक राजकीय विश्लेषकांची मतं खोटी ठरवली आहेत. अनेकदा ठाकरे सरकारमधील नाराजी, मतभेद चव्हाट्यावरही आले. एवढंच नाही तर विरोधकांनीही वेळोवेळी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अनेकदा तो यशस्वी झाल्याचंही पाहायला मिळालं. पण तरिही वेळोवेळी आपसी मतभेद दूर करत, ठाकरे सरकारनं आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 

23:11 PM (IST)  •  28 Nov 2021

चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या प्रकरणाचे रुग्ण वाढू लागल्यानं जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आलेत. तसेच त्याला ओ मायक्रोनची लागण झाली आहे का? याचीही तपासणी केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

23:08 PM (IST)  •  28 Nov 2021

भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही

 

भिवंडीतील अन्सारी मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभाच्या दरम्यान आतिषबाजीमुळे आग लागली असून त्यामध्ये अनेक दुचाकी व वाहन जळून खाक झाल्या आहेत. आगीवर  नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

19:43 PM (IST)  •  28 Nov 2021

पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 90 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 90 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 852 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3926 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

18:43 PM (IST)  •  28 Nov 2021

चर्चेला मला बोलवा, एसटी विलिनीकरण कसं करायचं ते मी सांगतो; प्रवीण दरेकरांचे आव्हान

एसटी संपाबाबत सरकारला मी आव्हान करतो, चर्चेला मला बोलवा विलनीकरण कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. 

16:09 PM (IST)  •  28 Nov 2021

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची उद्या तातडीने बैठक; ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर बैठक होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाची उद्या तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर बैठक होत असल्याचे म्हटले जात आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Embed widget