Maharashtra Breaking News LIVE Updates: भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात अन्सारी मॅरेज हॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी
पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात घडलाय. दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रस्ता ओलंडणाऱ्या नागरिकांना अज्ञात वाहनानं धडक दिलीय. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर, तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. जखमींवर दौंड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एक मुलगा, एक मुलगी आणि एका महिलेचा समावेश आहे.
परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी
वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे आले आहेत 50 लाख रुपये द्या अन्यथा आर .डी .एक्स ने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्वस्त च्या नावाने आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना एक पत्र मिळालं ज्यामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर डी एक्सने मंदिर उडवून देऊ असा मजकूर लिहलेला आहे.
राज्यात आतापर्यंत 37 अंशतः डेपो सुरू
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यातून राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला जातोय. याचपार्श्वभूमीवर राज्यातील 37 अंशतः डेपो आता सुरू झाल्याची माहिती समोर आलीय.
कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
राज्यात कोरोनामुळे निधन झालेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
परमवीर सिंग यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द
परमवीर सिंग यांच्या विरोधातील अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले. परंतु कोर्टाने दोन अटी देखील घातल्या आहेत. जेव्हा जेव्हा तपस अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि 15 हजाराचा पर्सनल बॉण्ड भरावा लागणार आहे. त्यामुळे परमवीर यांना सध्या तरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
जुना मुंबई -पुणे मार्गावर खालापूर जवळ अपघात
जुना मुंबई -पुणे मार्गावर खालापूर जवळ एक अपघात झाला आहे. रिक्षा, टेम्पो आणि कारचा हा अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. महड फाटानजीक रिक्षा टेम्पो पलटी झाल्याने वाहने बाजूला करण्यात आली. जखमींना खालापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक, उमराणेजवळ 3 एसटी बस फोडल्या
नाशिक जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. उमराणेजवळ 3 एसटी बसेस फोडल्या. मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ 3 एसटी बसेस फोडल्या. एक चालक जखमी, सर्व प्रवासी सुरक्षित आहे. नाशिकहून मालेगावकडे जाताना, धुळेहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून ग्रामीण पोलिसांनी 600 पोलिसांचा बंदोबस्त देऊनही दगडफेक करण्यात आली आहे. नाशिकच्या 1 नंबर डेपोतून दिवसभरात 33 बस बाहेर पडल्या. दिवसभरात 106 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
ओमिक्रॉन व्हेरियंटची धास्ती, उद्या मुख्यमंत्री सर्व विभागांशी चर्चा करणार
राज्यातील ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता उद्या मुख्यमंत्री सर्व विभागाची बैठक करणार आहेत. राज्यातील शाळा सुरु करायच्या की नाही यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमचा तपास सुरू
31 ऑक्टोबरला झालेला आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. आरोग्य विभागाच्या गट ड परिक्षेचा पेपर परिक्षेआधी फोडून 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 104 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 94 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 845 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4569 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.