एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. ओमायक्रॉनमुळं बंद झालेल्या शाळा आजपासून सुरु होणार, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष, तर १४ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय,
 राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. 

2. मी देखील गुन्हेगार...निवडणुकीत कमी पडल्याची कबुली देताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रमाणे रिंगणात उतरण्याचा शिवसेना नेत्यांना सल्ला
 
3. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याचं आव्हान, दुपारी साडे तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
 
4. नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच, भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्याचं दहन
 
5. पाकिस्तानातून मुंबईत धडकलेलं धुळीचं वादळ कोकणात धडकणार, ताशी 20 ते 30 किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज

Dust storm north Konkan area include Mumbai : पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा महाराष्ट्रातील  वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. काल सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  सुमारे तास 20-30 किमी वेगाने धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे.  मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागांत धुळीचे वारे येण्याची शक्यता आहे, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.  

6. राज्यातील कमाल तापमानात मोठी घट, मुंबईसह राज्यभरात गारवा वाढला, पुढील 2-3 दिवस चित्र कायम राहणार
 
7. मोठ्या शहरांत झपाट्यानं पसरणारा ओमायक्रॉन समूह संसर्गाच्या टप्प्यावर, ‘इन्साकॉग’चा इशारा, बीए.टू व्हेरियन्टचाही भारतात शिरकाव
 
8.  एबीपी माझाचा सर्वात मोठा इम्पॅक्ट, रणजीतसिंह डिसले गुरुजींना अखेर रजा मंजूर, अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा
 
9. वीज कापण्याशिवाय आता पर्याय नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाणीपुरवठा विभागासह विविध विभागांकडे 8 हजार 924 कोटींची थकबाकी.

10. चित्तथरारक सामन्यात भारत चार धावांनी पराभूत, एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावली, आफ्रिकेकडून क्लिनस्वीप

20:31 PM (IST)  •  24 Jan 2022

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता आहे. संसदेतल्या जवळपास सातशे ते आठशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे.

19:56 PM (IST)  •  24 Jan 2022

औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज ऑनलाईन

उद्यापासून (मंगळवार) औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज ऑनलाईन सुरु करण्यात येत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने हा निर्णय़ घेण्यात आला आहे.

18:45 PM (IST)  •  24 Jan 2022

मुंबई भाजप कार्यकारिणीची उद्या महत्वपूर्ण बैठक

मुंबई भाजप कार्यकारिणीची उद्या महत्वपूर्ण बैठक होणार आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आक्रमक रणनितीवर उद्या महत्वपूर्ण बैठक उदया पार पडणार आहे.  विरोधी पक्षनेते घेणार मुंबई भाजप कार्यकारिणीचा  आढावा घेणार आहे. भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर उपस्थित राहणार आहे

17:31 PM (IST)  •  24 Jan 2022

चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण

चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.  त्यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की,  माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती .

16:37 PM (IST)  •  24 Jan 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर आज हे पुरस्कार जाहीर झाले. जळगाव येथील शिवांगी काळे हिने 'वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने 'नव संशोधन' मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने 'क्रीडा' श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget