Maharashtra Breaking News LIVE Updates : इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Railways collects fines : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काही निर्बंध घातले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या कोरोनाच्या काळात मध्य रेल्वेने देखील अनेक प्रवाशांवर कारवाई केली आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे ज्या प्रवाशांनी पालन केले नाही त्यांच्याकडून मध्य रेल्वेने दंड वसूल केला आहे. या महिन्यात आत्तापर्यंत रेल्वे स्टेशनवर मास्क न घालणाऱ्या 2 हजार 293 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून 3.93 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेकडून वारंवार प्रवाशांना कोरोनाच्या संदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरी देखील काही प्रवाशी नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेन त्यांच्याविरोधात कारवाई करत दंड वसूल केला आहे. मध्ये रेल्वेने ही मोहिम एप्रील 2021 पासून सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत एकूण 30 हजार 375 प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली असून, त्यांच्याकडून 50.20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 12 जानेवारीला रेल्वे स्टेशनवर मास्क न घातलेल्या 256 प्रवाशांवर कारावाई केली. त्यांच्याकडून 44 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Kiran Mane : छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय भूमिका देखील सोशल मीडियावर मांडत आहेत. किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. पण किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे.
एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.
इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतलाय. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती. त्याचबरोबर या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज आणि परिक्षा फी भरण्यासाठी आता 31 जानेवारीपर्यंत शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा 20 फेब्रुवारीला होणार होती
अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढणे म्हणजे मोगलशाही पेक्षा वाईट आणि राज्य माने यांना सरकारने न्याय दयावा... सचिन खरात
अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढणे म्हणजे मोगलशाही पेक्षा वाईट आणि राज्य माने यांना सरकारने न्याय दयावा... सचिन खरात
एखाद्या पक्षाला बहुमताने सत्ता मिळते म्हणजे त्या पक्षाला हम करेसो कायदा करण्याचा आणि लोकशाहीच्या चिंधड्या करण्याचा दिलेला नाही. म्हणून मराठी अभिनेते किरण माने यांना मालिकेतुन काढून टाकले हे कृत्य मोगलशाही पेक्षाही वाईट आहेत या कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष निषेध करत असून महाराष्ट्र सरकारने याची त्वरित दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करावी आणि किरण माने यांना न्याय दयावा.
ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांना कोरोनाचा संसर्ग
ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहे. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका आहे.
शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गांपैकी एका बाजूच्या टनेलचे काम पूर्ण
पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग भुयारी आहे. या मार्गिकेची लांबी ६ किमी असून त्यामध्ये शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हि पाच भूमिगत स्थानके आहेत. कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाची लांबी ६ किमी असुन जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन टनेल बांधण्यात येत आहे. या दोन टनेल पैकी एका बाजूचे टनेल खोदण्याचे काम आज पुर्ण झाले आहे. एकुण १२ किमी टनेल पैकी १०.८ किमी (९० % ) टनेलचे काम पुर्ण झाले आहे. आज दि. १४.०१.२०२२ रोजी स्वारगेट वरून निघालेले पवना नावाचे टनेल बोरींग मशीन बुधवार पेठ येथील भूमिगत स्थानकात पोहोचले आणि ब्रेक थ्रू साधला गेला आहे. स्वारगेट मधून निघालेले चवथे टनेल बोरिंग मशीन मंडई स्थानकाजवळ असुन लवकरच ते उर्वरीत १.२ किमीचा बोगदा पुर्ण करून बुधवार पेठ स्थानकाजवळ मार्च २०२२ अखेरीस पोहोचेल.
ज्या ज्या मार्गाने इंपेरिकल डाटा गोळा होईल त्या मार्गाने गोळा करायचा आहे - छगन भुजबळ
ज्या ज्या मार्गाने इंपेरिकल डाटा गोळा होईल त्या मार्गाने गोळा करायचा आहे. आपण जो अध्यादेश काढला त्याचा बेस काय आहे, हे न्यायालय पटवून देत आहोत. 17 जानेवारी ला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात अजनीं दमानिया पुन्हा कोर्टात गेल्या त्यावर काही भाष्य नाही. कोणाला काय करायचे करू द्या, आम्ही बोलणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले