Maharashtra Breaking News LIVE Updates : पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
भारताच्या ताफ्यातील 'किलर्स स्क्वॉड्रन'; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'राष्ट्रपती मानांकन'
Killer Squadron : भारतीय नौदलात शौर्य गाजविणाऱ्या 22 व्या 'किलर्स स्क्वॉड्रन'ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'राष्ट्रपती मानांकन' मिळालं. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यादाच अशाप्रकारे एका तुकडीला सर्वोच्च राष्ट्रपती मानांकन मिळालं आहे.
1971 भारत पाक युद्धामध्ये भारताला मिळालेल्या विजयाला 50 वर्ष पूर्ण होतयेत. यामध्ये भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांनी महत्वाची कामगिरी करत या ताफ्याने पाकिस्तानच्या पाक सागरी हद्दीत जाऊन कंबरडे मोडले. त्यानंतर या नौदलाच्या ताफ्याला 'किलर्स स्क्वॉड्रन' हे नाव देण्यात आला आणि याच 'किलर्स स्क्वॉड्रन'च्या शौर्याला सलाम म्हणून हे राष्ट्रपती मानांकन ताफ्याला मिळतंय. या ताफ्यातील प्रबळ वर्गाच्या दोन युद्धनौका यामध्ये प्रबळ प्रलय युद्धनौका तर वीर वर्गाच्या सहा यामध्ये विनाश, निःशंक, नाशक, विद्युत, विपुल, विभूती अशा एकूण 8 युद्धनौका 'किलर्स स्क्वॉड्रन'मध्ये आहेत.
1971 भारत पाकिस्तान युद्धातील भरताच्या विजयला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय नौदलाने जी भूमिका बजावली जी कामगिरी केली. त्याचं जगभर कौतुक झालं शिवाय विशेष नोंद घेण्यात आली. पाकिस्तनाच्या सागरी हद्दीत घुसून पाकचं कंबरडं मोडण्याचं काम नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या ताफ्यांनी केलं. म्हणूनच या भारतीय नौदलातील या ताफ्याला 'किलर्स स्क्वॉड्रन' हे बिरुद मिळालं. याच किलर्स स्क्वॉड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरवण्यात येणार असून राष्ट्रपती मानांकन मिळतंय.
पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांना पुणे पोलीसांच्या सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे. डॉक्टर बोटले यांच्याकडेआरोग्य विभागाच्या 31 ऑक्टोबरला झालेल्या परिक्षेची प्रश्नपत्रिका सेट करण्याची जबाबदारी होती. डॉक्टर बोटले यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत प्रियंका गांधी यांची घेणार भेट
शिवसेना खासदार संजय राऊत संध्याकाळी सात वाजता प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. प्रियंका उत्तर प्रदेश महासचिव आहेत, त्यामुळे यूपी निवडणुकांबाबत काही खलबतं होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी माहूरच्या रेणुकामातेचे घेतले दर्शन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज माहूर गडावरील साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ पीठ असणाऱ्या श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. आज दुपारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेणुकामाता मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून महाआरती केली.
गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या युवकाला मंत्री भुमरेंच्या भावाकडून बेदम मारहाण
रोहयो राज्यमंत्री संदिपान घुमरे यांचे बंधू राजू आसाराम घुमरे यांनी पाचोड मधील बबलू उर्फ रंजीत नरवडे यांना बेदम मारहाण केली .आहे राजू भुमरे यांच्यासह दहा ते पंधरा लोकांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली आहे. रणजीत नरोडे हे बीड हायवे क्रमांक 211 ते साजगाव रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराचा फेसबुक लाईव्ह करत होते त्याच वेळी राजू घुमरे यांच्यासह काही लोक लाठ्या-काठ्या घेऊन आले आणि शिवीगाळ करत रणजीत यांना बेदम मारहाण केली आहे रणजीत यांच्या पाठीवर मारहाण केवळ म्हटले आहेत त्यांच्या हातावर देखील मारहाण केल्याच्या खुना आहेत. हायवे क्रमांक 211 साजेगाव रस्त्यावर काम न करता पैसे उचलल्याचा नरवाडे यांचा यांचा आरोप आहे.
यशोमती ठाकूर यांना निवेदन देतांना धमकी
अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देतांना धमकी दिल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप...
ओबीसी महासभाचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण गाढवे हे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांना एसटी संपाबाबत निवेदन देण्यासाठी आले असता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासोबत बोलाचाली झाली. बघून घेऊ अशी धमकी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिली असा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिथं उपस्थित पोलिसांना सांगितले की, मी तक्रार देते याच्यावर कारवाई करा असे निर्देश दिले...