भारताच्या ताफ्यातील 'किलर्स स्क्वॉड्रन'; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'राष्ट्रपती मानांकन'
Killer Squadron : 1971 भारत पाक युद्धामध्ये भारताला मिळालेल्या विजयाला 50 वर्ष पूर्ण होतयेत. यामध्ये भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांनी महत्वाची कामगिरी करत पाकिस्तानचं कंबरडे मोडलं होतं.
Killer Squadron : भारतीय नौदलात शौर्य गाजविणाऱ्या 22 व्या 'किलर्स स्क्वॉड्रन'ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'राष्ट्रपती मानांकन' मिळालं. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यादाच अशाप्रकारे एका तुकडीला सर्वोच्च राष्ट्रपती मानांकन मिळालं आहे.
1971 भारत पाक युद्धामध्ये भारताला मिळालेल्या विजयाला 50 वर्ष पूर्ण होतयेत. यामध्ये भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांनी महत्वाची कामगिरी करत या ताफ्याने पाकिस्तानच्या पाक सागरी हद्दीत जाऊन कंबरडे मोडले. त्यानंतर या नौदलाच्या ताफ्याला 'किलर्स स्क्वॉड्रन' हे नाव देण्यात आला आणि याच 'किलर्स स्क्वॉड्रन'च्या शौर्याला सलाम म्हणून हे राष्ट्रपती मानांकन ताफ्याला मिळतंय. या ताफ्यातील प्रबळ वर्गाच्या दोन युद्धनौका यामध्ये प्रबळ प्रलय युद्धनौका तर वीर वर्गाच्या सहा यामध्ये विनाश, निःशंक, नाशक, विद्युत, विपुल, विभूती अशा एकूण 8 युद्धनौका 'किलर्स स्क्वॉड्रन'मध्ये आहेत.
1971 भारत पाकिस्तान युद्धातील भरताच्या विजयला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय नौदलाने जी भूमिका बजावली जी कामगिरी केली. त्याचं जगभर कौतुक झालं शिवाय विशेष नोंद घेण्यात आली. पाकिस्तनाच्या सागरी हद्दीत घुसून पाकचं कंबरडं मोडण्याचं काम नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या ताफ्यांनी केलं. म्हणूनच या भारतीय नौदलातील या ताफ्याला 'किलर्स स्क्वॉड्रन' हे बिरुद मिळालं. याच किलर्स स्क्वॉड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरवण्यात येणार असून राष्ट्रपती मानांकन मिळतंय.
3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून अमृतसर, पठाणकोठ, श्रीनगर, अवंतीपूर, अमृतसर, जोधपूर, अंबाला, आग्रा, उत्तरलाय येथे हल्ला चढवला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या दिवशी राष्ट्राला उद्देश केलेल्या नभोवाणीवरील भाषणात हे भारताविरुद्ध पुकारलेले युद्ध असल्याचे सांगून भारत कडवे उत्तर देईल, असं जाहीर केलं. सैन्यदलांना तसे आदेशही दिले. पंतप्रधानांच्या आदेशानंतर नौदलप्रमुख असलेल्या अॅडमिरल एस. एम. नंदा यांनी नौदलातील सर्वात तरुण ताफा कराची मोहिमेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आणि या मोहिमेला नाव दिले 'ऑपरेशन ट्रायडेंट'.
ऑपरेशन ट्रायडेंटला 4 डिसेंबरच्या रात्री सुरवात झाली. INS वीर, INS निःपात, INS निर्घात या तीन क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका कराची बंदराकडे मोहीनेवर निघाल्या. यामध्ये सुरुवातीला INS निर्घात रात्री साडे 10 ते 11च्या दरम्यान पाकिस्तनाच्या PNS खैबर या युद्धनौकेला लक्ष करत क्षेपणास्त्र डागले आणि अवघ्या 45 मिनिटांत या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली. तर दुसरीकडे INS निःपातने एमव्ही व्हीनस चॅलेंजर या युद्धनौकेवर हल्ला केला आणि दुसरी जलसमाधी या युद्धनौकेला मिळाली. तर INS वीरने PNS मूहाफिजवर हल्ला चढवला आणि ही युद्धनौकेला सुद्धा जलसमाधी मिळाली. जगातील आधुनिक नेव्हल ऑपरेशन मधलं सर्वाधिक यशस्वी राहिलेलं ऑपरेशन मानलं जातं.
ऑपरेशन ट्रायडेंट नंतर दोन दिवसांनी 8 आणि 9 डिसेंबरला 'ऑपरेशन पायथन'ला सुरवात झाली. यात 'INS विनाश' ने कराची बंदरनजीक असलेल्या पाकिस्तनाच्या ढाका या इंधन नौकेवर हल्ला चढवला आणि या युद्धनौकेलासुद्धा जलसमाधी मिळाली. सोबतच केयमारी तेलसाठे उद्ध्वस्त केले. त्यानंतर ती आग पाच ते सहा दिवस कराची बंदरावर धुमसत होती. याच दोन ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानचे कंबरडं मोडलं भारतीय विजयाचे लक्ष हे जवळ आलं.
1971 च्या भारतीय पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने आपलं साहस आणि आपलं शौर्य दाखवलं त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नौदलाने जे ऑपरेशन जे नियोजन केलं त्याची दखल जगाच्या पातळीवर घेण्यात आली आणि याच शौर्याला सलाम म्हणून या किलर्स स्क्वॅडर्नला राष्ट्रपतींच्या हस्ते 'राष्ट्रपती मानांकन' मिळतंय जे भारतीय नौदलासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे.