Maharashtra Breaking News LIVE Updates : गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केला कालिचरण बाबावर गुन्हा
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ? दिल्लीत 496, तर मुंबईत 1377 दैनंदिन कोरोना रुग्ण
Coronavirus Update : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19 Update) वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशातील मंदावलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉनबाधितांच्या (Omicron) संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. देशभरातील 21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.
देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव
दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 496 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं. तसेच कोरोना संसर्गाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये 331 रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, आता हा रेकॉर्डही मोडीत निघाला असून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे.
झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या राजधानीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे दिल्लीमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सिनेमा हॉल, बँक्वेट हॉल, स्पा बंद करण्यात आले आहेत. रेस्टॉरंटही 50 टक्के उपस्थितीसह सुरु आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, दिल्लीतील कोरोना स्थितीवर लक्ष असून बदलणारी स्थितीचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या तरी राजधानीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले...
Ajit Pawar : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे सोपवायवला हवी होती, असेही विरोधकांनी म्हटले होते. विरोधकांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये असे अजित पवार यांनी म्हटले.
विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, या अधिवेशानात तीन विधेयके मागे घेण्यात आली आहेत. अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित पार पाडले असून शक्ती विधेयकालाही या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे. इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी 435 कोटी मंजूर करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ठरलेल्या निधीपेक्षा अधिक निधी सरकारने दिला आहे. विदर्भाला 3 टक्के अधिक रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेड एसटी महामंडळ आगारातील कर्मचाऱ्यांची ईच्छा मरणाची मागणी
गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणा साठी कामबंद आंदोलन पुकारलेय. तर या आंदोलना दरम्यान जवळपास 60 जणांचा जीव गेलाय. तर नांदेड आगारातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून मृत्यूला कवटाळलेय. आज नांदेड एसटी आगारातील 120 कर्मचाऱ्यांनी आपल्या सहीनिशी जिल्हाधिकाऱ्या मार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन ईच्छा मरणाची परवानगी मागितलीय.गेल्या दोन महिन्यांपासून एसटी आंदोलन चालू असून सरकार विलीनीकरणही करत नाही व ठोस निर्णय घेत नाही. असा आरोप करत, आपल्या कुटुंबावर आंदोलनामुळे आर्थिक चणचण निर्माण होऊन उपासमारीची वेळ आल्याचे सांगत मरणाची परवानगी मगितलीय.
भिवंडीत एकाच कुटुंबातील 4 जण ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले
भिवंडी महापालिका क्षेत्रात गैबीनगर परिसरात कतार देशातून आलेला २२ वर्षीय तरुण पहिला ओमायक्रोनचा विषाणू बाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीत कोविड-१९ या विषाणूची दुसरी लाट ओसरत असताना विषाणूचे रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने पालिका आरोग्य विभागाच्या वतीने ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास करून भिवंडीत आलेल्या व्यक्तींसह त्यांच्या निकटवर्ती नातेवाईकांचा शोधून त्यांची कोविड चाचणी(आर.टी.पी.सी.आर) करण्यात येत आहे. यामध्ये कतारहुन आलेल्या रुग्णांच्या तीन नातेवाईकांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. कतारहुन आलेल्या रुग्णांच्या तीन नातेवाईकांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे आढळून आल्याने त्या तिन्ही रुग्नांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कतार येथून आलेल्या ओमायक्रोनच्या पहिल्या रुग्णाचे कोविडचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याने बाधित रुग्णास कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. परंतु नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरीतील रँडम तपासणीत पहिल्यांदाच ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे एक रुग्ण रँडम तपासात आढळला आहे. यात 2 पुरुष, 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. यातील एक जपान, एक थायलंड आणि एक दक्षिण आफ्रिकेतून आलाय. तर एक रुग्ण रँडम तपासात आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत शहरात ओमायक्रॉनचे 22 रुग्ण आढळलेत पैकी 13 रुग्ण निगेटिव्ह झालेले आहेत.
पिंपरीतील रँडम तपासणीत पहिल्यांदाच ओमयक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार ओमयक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे एक रुग्ण रँडम तपासात आढळला आहे. यात 2 पुरुष, 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. यातील एक जपान, एक थायलंड आणि एक दक्षिण आफ्रिकेतून आलाय. तर एक रुग्ण रँडम तपासात आढळल्याने चिंता व्यक्त केली जातीये. आत्तापर्यंत शहरात ओमयक्रोनचे 22 रुग्ण आढळलेत पैकी 13 रुग्ण निगेटिव्ह झालेले आहेत.
बापाने केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार
सदर आरोपींना पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती कमला बोरा यांचे समोर हजर केले असता सरकारी वकिलांनी ७ दिवस पोलिस कस्टडी मागितली होती परंतु आरोपी चे वकील ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सदर आरोपींना मे. कोर्टाने ५ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत. आरोपी तर्फे ॲड. किर्तीपाल सर्वगोड, ॲड. राहुल भोसले व सरकार तर्फे सरकारी वकील ॲड.सारंग वांगीकर यांनी काम पाहिले. पिडीताने मुलीला जन्म दिला आहे. सध्या पीडित सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.