एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates: आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी

Background

हिवाळी अधिवेशनाचा अखेचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची उत्सुकता शिगेला

आजचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यावर सरकार ठाम आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. तिकडे कोकणात वातावरण तापलंय. शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. 

राज्यपालांनी उत्तर दिलं नाही तर सहमती आहे, असं समजून निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीनं केली आहे. मात्र, तसं केल्यास पुढचे परिणाम काय होतील याचीही चाचपणी सत्ताधारी करत असल्याचं कळतं. त्यामुळे आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काय घडामोडी घडत आहेत याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्हालाही मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी 12 निलंबित भाजप आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे. आमचा मतदानाचा हक्का हिरावला जातोय. मतदान करणं संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी विनंती राज्यपालांकडे केली आहे.

अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेंची न्यायालयात धाव; आज सुनावणी, अटक टळणार?

संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ टीम सहकार्याला असेल. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड प्रदीप घरत आणि अॅड भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी 2.45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं आहे. 

19:03 PM (IST)  •  28 Dec 2021

आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी

आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

17:11 PM (IST)  •  28 Dec 2021

दौंड-पुणे रेल्वे मार्गावर शालिमार किसान एक्सप्रेसचा डबा घसरला, वाहतूक ठप्प

येवला येथून येत असताना मनमाड जवळच्या नागरचौकी जवळ दौंड-पुणे रेल्वे मार्गावर शालिमार या किसान एक्सप्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रुळावरून डबा घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू आहे. डबा  रुळावर ठेवण्याचे काम सुरू आहे, 

16:29 PM (IST)  •  28 Dec 2021

पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील ही घटना घडलीय. गंगापूर धरणातून सध्या रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्यात आलंय. त्यामुळं पाटाला पाणी आल्यानं परिसरातील मुलं पाण्यात पोहण्यासाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने मुलांचा शोध घेतला मात्र मुलाचे प्राण वाचले नाही. 

13:05 PM (IST)  •  28 Dec 2021

आदित्य ठाकरे आणि मांजरीचा संबंध काय; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सवाल

11:46 AM (IST)  •  28 Dec 2021

आमदार नितेश राणे यांचा पोलिसांकडून शोध सुरू; सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांच्या टीम गोव्यात दाखल

आमदार नितेश राणे यांचा पोलिसांकडून शोध सुरू, सिंधुदुर्ग आणि रायगड पोलिसांच्या टीम गोव्यात दाखल.आमदार नितेश राणे गोव्यात असण्याची शक्यता पोलिसांकडून जोरदार शोधकार्य सुरू
 
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Embed widget