(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार : नाना पटोले
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत!
आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan)नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. यासंदर्भात महत्वाचं अपडेट समोर आलं असून नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.
आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे की, अध्यक्ष नारळीकर यांना आणण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते येणार नाहीत. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील प्रकृतीच्या कारणामुळं उपस्थित राहू शकणार नाहीत. ते ऑनलाईन हजेरी लावतील अशी माहिती आहे. माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो देखील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असणार आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये संमेलनाचा उत्साह आहे. थंडीच्या वातावरणात देखील साहित्याच्या या मेळ्यात लोकांनी भरभरुन सहभाग घेतला आहे, असं ते म्हणाले. हा उत्साह शेवटच्या दिवसांपर्यंत कायम राहील, असं देखील भुजबळ म्हणाले.
Omicron Variant : भारतात ओमायक्रॉननं वाढवली धास्ती; लसीचा बुस्टर डोस आवश्यक? NITI Aayog म्हणतंय...
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे. अशातच भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) शिरकाव केला आहे. बंगळुरूमध्ये दोन जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे लसीकरणात काही बदल करण्याची गरज आहे का? कोरोना लसीचा बुस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसची गरज आहे का? लहान मुलांचं लसीकरण सुरु झालेलं नाही, त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी त्यांचं लसीकरण तात्काळ सुरु करण्याची गरज आहे का? यांसारखे अनेक प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत अद्याप फारशी माहिती कळालेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरससंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच लसीकरणाबाबतचे निर्णय विज्ञान आणि वैज्ञानिक निकशांच्या आधारावर घेतले जातात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत या व्हायरसबाबत मिळालेली माहिती पुरेशी नाही. याबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच लसीचा आणखी एक डोस किंवा बुस्टर डोस डोस द्यावा की, नाही? याबाबतही ठामपणे काहीच सांगणं अशक्य आहे. लस किंवा उपचाराबाबत असे निर्णय सर्व पैलू, वैज्ञानिक पुरावे, संशोधन लक्षात घेऊन घेतले जातात.
यवतमाळमध्ये दुचाकीचा धक्का लागल्याने तलवारीने युवकावर हल्ला
यवतमाळमधील पुसद तालुक्यातील काळी दौलत येथे दुचाकीचा धक्का लागल्याने तलवारीने युवकावर हल्ला करण्यात आला. हल्यात 22 वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. काळी दौलतमध्ये तणाव झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
श्याम शेषराव राठोड हे मृतक युवकाचे नाव आहे.
हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार : नाना पटोले
ममता बॅनर्जींनी महाराष्ट्रात येऊन काँग्रेसला डिवचल्यानं काँग्रेसने ताठर भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस यांचा भाजपात प्रवेश, महाविकास आघाडीच्या पॅनेलला धक्का
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत प्रकाश गवस यांनी भाजपा चा झेंडा हाती घेतल्याने महा विकास आघाडीच्या पॅनलला हा धक्का मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर प्रकाश गवस यांनी यापूर्वी दोन टर्म काम केले असून प्रकाश गवस यांची उमेदवारी महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण करणारी असणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर प्रकाश गवस यांनी दोडामार्ग विकास संस्था मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले.
विठुरायाच्या चरणी हजारो भाविकांची गर्दी , ओमायक्रोन धोक्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात तपासण्या वाढवल्या
सध्या विठुरायाच्या दर्शनासाठी पूर्वी प्रमाणे रोज हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी होऊ लागली असून यामध्ये दक्षिण भारतातील भाविकांची संख्या मोठी असल्याने मंदिर प्रशासनाने ओमिक्रोन चा धोका पाहून काटेकोरपणे तपासणीला सुरुवात केली आहे . तसे विठुरायाला कानडा विठ्ठलु कर्नाटकी असे संबोधले जाते आणि यामुळेच दक्षिण भारतातील हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात . त्यात सध्या महाराष्ट्रात एसटी बसेसचे आंदोलन अजून संपले नसल्याने सर्वसामान्य भाविकाला पंढरपूरला येत येत नसले तरी परराज्यातील भाविकांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे . यात प्रामुख्याने कर्नाटक , आंध्रप्रदेश , तामिळनाडू , तेलंगणा या राज्यातून मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त देवाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत . या भाविकांच्या मध्ये बेंगलोर , हैद्राबाद , चेन्नई अशा शहरातील भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने मंदिर प्रशासनाने कोरोना तपासणीमध्ये अत्यंत काटेकोरपणा आणला आहे . आता प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेत चार ते पाच ठिकाणी सॅनिटायझर मारण्यात येऊन त्याचे तापमान तपासण्यात येत आहे . प्रत्येक भाविकाला मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नसून हजारोंच्या संख्येने भाविक असूनही सोशल डिस्टन्स चे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आलेली आहे . सध्या दर दोन तासांनी मंदिराची सफाई केली जात असून मंदिर प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घ्यायला सुरुवात केल्याचे मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले . दरम्यान ओमिक्रोनचा धोका वाढत असताना राज्यांच्या सीमेवर तपासणी कठोर केल्यास विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या दक्षिण भारतातील भाविकांमुळे धोका वाढणार नाही .
विदेशातून आलेल्या प्रवाशांना पनवेल मनपा हाॅटेलमध्ये करणार क्वारंटाइन
पनवेल महापालिका क्षेत्रात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिका सज्ज झाली आहे . सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेतुन कोणतेही प्रवासी आले नसले तरी गेल्या आठवड्यात आलेल्या प्रवाशांना पनवेल महानगर पालिकेने हाॅटेल मध्ये त्यांना क्वारन्टाईन केले आहे.
आफ्रिकेतून आलेल्या ६ प्रवाशांना निघरानी खाली ठेवण्यात आले आहे. सात दिवसानंतर या ६ प्रवाशांची परत ऐकदा आरटीपीसीआर करण्यात येणार आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना थेट घराकडे न सोडतां हाॅटेल मध्ये ठेवण्यात येणार असून यासाठी ३ हाॅटेल बरोबर पनवेल महानगर पालिकेने करार केले आहेत. याबाबत विमानतळावर उतरून पनवेल मध्ये येणार्या प्रवाशांची माहिती सतत घेतली जात आहे.